खारघर येथील नवीन पूल वाहतुकीसाठी खुला

खारघर (kharghar) वसाहतीमध्ये प्रवेश करण्यासाठी दुसरे प्रवेशद्वार गणेश चतुर्थीच्या (ganesh festival) मुहूर्तावर वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. यासाठी सिडको मंडळाने सुमारे एक कोटी रुपये खर्च केला आहे. या पुलामुळे शीव (sion)-पनवेल (panvel)महामार्गावरुन थेट कोपरा पुलावरून खारघर वसाहतीमध्ये वाहनांना जाता येईल.

यापूर्वीचा या ठिकाणचा पूल हा हलक्या वाहनांसाठी होता. येथे अनेक वर्षांपासुन नवीन रुंद पूल बांधण्याची मागणी वारंवार वाहनाचालकांकडून केली जात होती.

खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी तात्पुरत्या स्वरुपात हा पूल कोपरा गावाजवळ बांधला होता. मात्र कायमस्वरूपी पूल बांधावा अशी मागणी नागरिकांकडून केल्यानंतर सिडको मंडळाने 22 मीटर रुंदीचा आणि साडेसात मीटर लांबीचा पूल (bridge) खाडी पात्रावर उभारला. 

या पुलावरून अवजड वाहतूक टाळण्यासाठी हाईटगेट लावणार आहे. यामुळे विनाअडथळा सेक्टर 12 ते सेक्टर 35 पर्यंत जाणाऱ्या या मार्गावरील प्रवास वेगाने होणार आहे. तसेच हा पुल बांधल्याने वाहतुककोंडीचाही प्रश्न सुटणार आहे. हा नव्याने  बांधलेला पुल वाहनचालकांसाठी सोयीचा आहे.


हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24