मुंबई कोस्टल रोडला 9 उद्याने आणि विहाराची जागा मिळेल

मुंबई (mumbai) कोस्टल रोड प्रकल्पा जवळ (coastal road project) लवकरच उद्यान तयार केली जाणार आहेत. एक दोन नव्हे तर या कोस्टल रोड प्रकल्पात 9 उद्यांनाचा समावेश आहे. जवळपास 70 हेक्टर जागेवार नागरिकांना फिरता येणार आहे.

याचे (green space) डिझाईन AECOM ने तयार केले असून, नोव्हेंबरमध्ये बांधकाम सुरू होईल. या नवीन जागेत वरळी (worli) ते प्रियदर्शनी पार्क दरम्यान असलेल्या नऊ उद्यानांचा समावेश असेल.

गार्डन (parks), नेचर कोव्ह आणि पार्क लाइन या 3 झोनमध्ये उद्यान विभागली जातील. या अहवालानुसार, 30% खुल्या क्षेत्रामध्ये पादचाऱ्यांसाठी फूटपाथ, सायकल लेन आणि 7.5 किलोमीटरचा फेर-फटका मारण्यासाठी मार्ग असेल. उर्वरित 70% क्षेत्रात गार्डन असतील.

उद्याने सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहतील. टाटा गार्डन, सेटलवाड लेन, महालक्ष्मी, हाजी अली ज्यूस सेंटर, लोटस जेट्टी, अट्रिया मॉल, वरळीतील मद्रासवाडी या भागात जाण्यासाठी नऊ मुख्य प्रवेश द्वार असतील.

उद्यानं सर्व वयोगटांसाठी असतील, त्यात मोठी फुटबॉल मैदाने, टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट, स्केटिंग रिंक, योगाची जागा आणि सायकलिंग मार्ग असतील. प्रत्येकाला उद्यानांचा आनंद घेता यावा यासाठी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध असतील.

दरम्यान, कोस्टल रोड पुलाचा एक भाग वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणार आहे. हा पुल 12 सप्टेंबर रोजी उघडला जाईल. सुरुवातीला, पुलाची फक्त दक्षिणेकडील बाजू खुली असेल. ज्यामुळे मरीन ड्राईव्हपासून वांद्र्याच्या दिशेने एका लेनची वाहतूक होऊ शकेल. 

2011 मध्ये माजी महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. तेव्हा हा प्रकल्प पहिल्यांदा प्रस्तावित करण्यात आला होता. या प्रकल्पात शहराच्या पश्चिम किनारपट्टीला जोडणारा रस्ता बनवण्याचे उद्दिष्ट होते.


हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24