Maharashtra Din 2025: महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन 1 मे रोजीच का साजरे करतात? जाणून घ्या


Maharashtra Din and Kamgar Din History: आज आपण महाराष्ट्राचा 66वा स्थापना दिवस साजरा करत आहोत. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील लोक हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा मोठ्या उत्साहात साजरा करतात. यादिवशी महाराष्ट्रात कामगार दिनसुद्धा साजरा केला जातो. 1 मे रोजीच महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन का साजरा केला जातो? चाल जाणून घेऊयात याचे उत्तर आणि या दिवसामागचा इतिहास चला जाणून घेऊयात…

कसा सुरु झाला महाराष्ट्र दिन? (Maharashtra Din History)

दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र आपला स्थापना दिन मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो. दरवर्षी या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि काही काळानंतर, मुंबई प्रांत होता ज्यामध्ये सध्या गुजरात आणि महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशांचा समावेश होता. आताचे गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होते. ब्रिटीश राजवटीत जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात हे बॉम्बे स्टेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकाच राज्याचा भाग होते. पण काही काळातच मराठी आणि गुजराती भाषिकांनी स्वतंत्र राज्यांच्या मागणीचा जोर धरला. 

जुलै १९५६ मध्ये मंजूर झालेल्या राज्य पुनर्रचना कायद्यानंतर, भाषिक आधारावर अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर भाषिक राज्यांसाठी दबाव वाढू लागला, गुजराती भाषिक लोकांना त्यांचे वेगळे राज्य हवे होते आणि मराठी भाषिक लोक महाराष्ट्र हवा होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे रूपांतर एका महत्त्वपूर्ण संघर्षात झाले. तेव्हा एक दुःखद घटना घडली. तेव्हा मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी शांततापूर्ण निदर्शनादरम्यान पोलिसांना दिसताच गोळीबार करण्याचे आदेश दिले. 

त्यागानंतरही, चळवळ अखेर यशस्वी झाली आणि तत्कालीन नेहरू सरकारने 1960 च्या मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत ऐतिहासिक विभाजन केले, ज्या अंतर्गत 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरातची स्वतंत्र राज्ये म्हणून निर्मिती करण्यात आली. यामुळेच 1 मे रोजी महाराष्ट्र्र दिन साजरा केला जातो. 

काय आहे कामगार दिनाचा इतिहास?  (Kamgar Din History)

कामगार दिन हा कामगारांच्या हितासाठी झालेल्या एका चळवळीतून सुरुवात झालेला दिवस आहे. 19व्या शतकाच्या मध्यावर कामगारांच्या एका चळवळीने  सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या चळवळीतून कामगारांच्या मागण्या पहिल्यांदाच जगासमोर मांडण्यात आल्या. 21 एप्रिल 1856 रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांनी आपल्या मागण्या सांगितल्या. कामगाऱ्यांचे दिवसाचे कामाचे तास ठराविक असावेत, या मागणीसाठी आंदोलन झाली. 1990 ला कामगारांची ही चळवळ अखेरीस अनेक पर्यटनानंतर यशस्वी झाली. 1989 आधी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरीस परिषद घेण्यात आली. त्या परिषदेमध्ये 1 मे 1890 हा दिवस जागतिक एकता दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरलं. त्यानंतर 1891 मध्ये 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करण्याचं मान्यता देण्यात आली.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24