केंद्र सरकारच्या वतीने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. विरोधी पक्ष इतके दिवस जातीनिहाय जनगणना करा, म्हणून घसा कोरडा करणारे नेते आता केंद
.
या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करत त्यांना प्रश्न विचारला आहे. या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्याचे औदार्य दाखवणार की नाक मुरडत घाणेरडे राजकारण करणार? असा सर्वसामान्य माणसांच्या मनातील प्रश्न असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका केली आहे.
स्वार्थी राजकारणासाठी पक्षांनी जातीचे संकुचित राजकारण केले
जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे आदरणीय शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसलेत आहेत? इतके दिवस जातीनिहाय जनगणना करा म्हणून घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचं औदार्य दाखवणार की नाक मुरडत घाणेरडं राजकारण करणार? हा सामान्य माणसाच्या मनातील सवाल आहे.
केवळ आपल्या स्वार्थी राजकारणासाठी या नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी जातीचे संकुचित राजकारण केले. पण या जातीतील नागरिकांना प्रगतीच्या, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एवढ्या वर्षात या राजकीय पक्षांनी काहीच केले नाही. आता आदरणीय मोदीजी यांच्या सरकारने या जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून या देशातील सर्वच जाती प्रवाहांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संकल्प केला असताना त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी श्रेय लाटण्याचे काम करीत आहेत, यातून या विरोधी पक्षांची संकुचित मानसिकता देशाला पुन्हा एकदा दिसून आली आहे. देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी जातीनिहाय जनगणनेसारखा क्रांतिकारी निर्णय घेतला. तेव्हा किमान अभिनंदन करण्याचं सौजन्य या नेत्यांनी दाखवावं ही अपेक्षा आहे.