रोटाव्हायरल एन्सेफलायटीसची ( रोटाव्हायरस संसर्गामुळे होणारा मेंदूला आलेली सूज) गंभीर गुंतागुंत असलेल्या व अकाली जन्मलेल्या बाळावर पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागातील टिमच्या मदतीने या प्रकरण
.
पुण्यात राहणाऱ्या तनिषा (३४) (नाव बदलले आहे) आणि निलय शिंदे (३७) (नाव बदलले आहे)या जोडप्याने आयव्हीएफ गर्भधारणेद्वारे जुळ्या बाळांना जन्म दिला. या बाळांपैकी एकाला श्वसनासंबंधीत सौम्य त्रास जाणवल्याने त्या मुलाला काही काळासाठी एनआयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले व प्रकृतीत सुधारणा होती घरी सोडण्यात आले. घरी आल्यानंतर हे बाळ आठ दिवसापर्यंत सामान्य होते, परंतु त्यानंतर त्याची हालचाल मंदावली झाली आणि ते स्तनपान नाकारु लागले. ताप, उलट्या, अतिसार किंवा पुरळ अशी कोणतीही लक्षणे दिसून आली नाही. नवव्या दिवशी तो अधिक सुस्त वाटु लागला आणि त्याला एनआयसीयूमध्ये पुन्हा दाखल करण्यात आले आणि नंतर त्याला पुढील उपचाराकरिता अंकुरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.जेव्हा तेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्याला ताप, संसर्गासारखी कोणतीही स्पष्ट लक्षणे आढळली नाही. त्याच्या जन्मा दरम्यान देखील कोणतीही गुंतागुंत आढळली नव्हती. रक्त चाचण्या आणि सेप्सिस सारख्या नियमित तपासणीतून कोणतेही निदान झाले नाही.
याबाबत नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. अनुषा राव म्हणाले की, सुरुवातील आम्हाला सेप्सिस(गंभीर संसर्ग) किंवा एस्फिक्सिया (ही एक वैद्यकीय स्थिती आहे, ज्यामध्ये शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही) चा संशय आला. मात्र बाळामध्ये तशी कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यानंतर मेंदूची एमआरआय चाचणी करण्यात आली ज्यामध्ये मेंदूच्या काही भागात लक्षणीय बदल दिसून आले – जे सिग्नल ट्रान्समिशनसारखे (सिग्नल पोहोचविण्याचे)महत्त्वाचे कार्य करतात. अकाली बाळांमध्ये हे संसर्ग, सूज किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दुखापत झाल्यास दिसून येते. एमआरआयने एन्सेफलायटीसचे निदान झाले असले तरी, नेमके कारण अस्पष्ट होते.
वैद्यकीय संचालक डॉ. सिद्धार्थ मदभूशी म्हणाले की, बाळाची सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड चाचणी सामान्य आली. रोटाव्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली, ज्यामुळे निदान निश्चित झाले. नवजात बाळांमध्ये सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड चाचणी नेहमीच विषाणूचा शोधू शकत नाही आणि अशावेळी पॉलिमरेझ चेन रिॲक्शन (डीएनएच्या विशिष्ट भागाची तपासणी) महत्त्वाची भूमिका बजावते.