नाशिक शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. 9 वर्षांच्या मुलाची वडिलांनी गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने नाशिक हादरले आहे. बाप एवढ्यावरच थांबला नाही. मुलाची हत्या केल्यानंतर त्याला एका गोणीत टाकून सासरवाडीत नेऊन पलंगावर टाकले असल्याची प्र
.
आपल्याच 9 वर्षांच्या मुलाला वडिलांनी गळा आवळून मारून टाकले. त्याचे मृतदेह एका गोणीत भरून सासरवाडीमध्ये जाऊन पलंगावर टाकले, या घटनेने एकच संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत. घटनेची माहिती नागरिकांनी दिल्यावर उपनगर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे समजते. सुमित पुजारी (35) असे आरोपी वडिलांचे नाव आहे. आरोपी बापाने 9 वर्षीय गणेशची हत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात सतत वादाचे वातावरण असायचे. सुमित पुजारी हे काही दिवसांपासून तणावात होते. कौटुंबिक कलह वाढला आणि त्याच्या रागाच्या भरात वडिलांनी मुलाचा खून केला. परंतु नेमके वाद काय होते? मुलाचा दोष काय होता? कौटुंबिक वाद किती गंभीर होता? या सगळ्याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, मुलाच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. पोलिस घटनेचा तपास करत असून आरोपी वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.