लोकशाहीतील कायदे मंडळ, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि पत्रकारिता या चार स्तंभांची एकी देशाने कधी अनुभवली नव्हती. आज हे सगळे वारकरी झाले आहेत. मतभेद टाळण्याकडे सर्वांचा कल आहे. ‘वन नेशन वन इंट्रेस्ट’ या विचारातून सर्वांनी मिळून आदर्श भारत घडवताना मतभेद आण
.
पत्रकार वरुणराज भिडे मित्र परिवारातर्फे एस. एम. जोशी सभागृहात आयोजित पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. ‘लोकमत’चे सहयोगी संपादक यदू जोशी (मुंबई) यांना ‘पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार’, तर ‘महाराष्ट्र टाइम्स’चे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर, ‘एबीपी माझा’चे प्रतिनिधी मिकी घई (पुणे) आणि ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी दिगंबर शिंदे (सांगली) यांना ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कार’ परुळेकर आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मंडळाचे प्रमुख उल्हास पवार आणि अंकुश काकडे या वेळी उपस्थित होते. पत्रकारिता पदविका अभ्यासक्रात पहिला क्रमांक मिळवलेले आनंद पवार यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय कार्यालयातर्फे पुरस्कार देण्यात आला.
राजू परुळेकर म्हणाले, विलक्षण कंगोरे असलेले समाजमन गढूळ झाले आहे. भाषेची अभिरुची घसरली आहे. मतभेदाला जागा उरलेली नाही. सर्वधर्मीय लोक समाज आणि देश म्हणून एक आहेत. एकमेकाशिवाय जगण्याची कल्पना केली, तर सर्व कोलमडणार आहोत. भिंतीमधील निवडक विटा बाजूला सारता येत नाहीत. समाजही असाच ताण्याबाण्यांनी बांधलेला असतो. पं. नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदूंचा पाकिस्तान होऊ दिला नाही. ही जबाबदारी आता पत्रकार, कलावंत आणि विचारी लोकांची आहे.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, उजवीकडे किंवा डावीकडे राहून जगता येते. मात्र, तुम्ही मध्यममार्गी असाल, तर गोंधळ उडण्याचा धोका आहे. विरोधी राजकारण करणे अवघड झाले आहे. बातमी लिहिण्याची मोकळीक आज नाही. पहलगाम हल्ल्यानंतर जात नाही, तर धर्म विचारून मारले या अनेकांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमुळे देशातील विखार आणि ध्रुवीकरण दिसून आले.