किमान माणुसकी म्हणून तरी आम्ही काय भोगले याचा विचार करा. आमच्या भावनांशी खेळू नका, अशी विनंती पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेले संतोष जगदाळे यांच्या पत्नीने केली आहे. दहशतवाद काय असतो? हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आणि अनुभवले आहे. ते आम्ही सोसले, दहश
.
या संदर्भात संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे आणि त्यांच्या आईने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकारणी लोकांच्या वक्तव्यांना, राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत. आम्ही पहलगाम येथे खूप भयंकर परिस्थिती अनुभवली आहे. आम्ही जे सांगतोय तेच लहान मुलांनी देखील सांगितले आहे. एक माणूस खोटे बोलतो, मात्र सगळेच लोक खोटे बोलणार नाहीत. तरीही राजकारणी लोक अशी वक्तव्य का करतात? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. हे करून तुम्ही आमच्या मनाशी खेळत आहात. तुम्ही आमच्या राज्यातील नेते असून आम्ही तुम्हाला मानतो. त्यामुळे कृपा करून या सर्वांवर राजकारण करू नका, अशी विनंती देखील जगदाळे यांच्या पत्नीने केली आहे.
काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा वादग्रस्त प्रश्न
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्याइतका वेळ आहे का? असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला आमंत्रण दिले होते. काही पर्यटकांनी गोळ्या झाडण्यापूर्वी दहशतवाद्यांनी धर्म विचारल्याचे सांगितले, तर काहींनी असे घडलेच नसल्याचे सांगितले. यावर वडेट्टीवारांनी वादग्रस्त वक्तव्य केले. दहशतवाद्यांनी मारण्यापूर्वी नाव आणि धर्म विचारला. त्यानंतर गोळ्या झाडल्या. ‘हिंदूंचं नाव विचारून त्यांना मारण्याएवढा दहशतवाद्यांकडे वेळ होता का?’ असे विजय वडेट्टीवार म्हणाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, असेही ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर टीका केली होती.
वडेट्टीवारांची ‘त्या’ वक्तव्यावरून माफी
दहशतवाद्यांकडे लोकांचा धर्म विचारायला वेळ असतो का? असे वक्तव्य करून गोत्यात आलेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीकेची झोड उठताच आज सपशेल माफी मागितली. मात्र, माझे वक्तव्य तोडून-मोडून दाखवल्याचा आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांवरच केला. अर्धवट दाखवण्याच्या भरवशावर देशात काहीतरी वेगळे वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम काही ठराविक माध्यमे करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.