महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे आणखी एक स्थानक, हाय स्पीड रेल मुंबईतून कधी धावणार? मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं


Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. बुलेट ट्रेन मुंबईत व महाराष्ट्रात कधी धावणार याची चर्चा सतत होत असते. सध्या गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी स्थानकांची उभारणी केली जात आहे तर काही ठिकाणी पुलांची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळं आता बुलेट ट्रेन कधी धावणार याची प्रतिक्षा नागरिकांना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन वाढवण बंदराशीही जोडण्यात येणार आहे. तर अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं होतं की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे एक स्थानक वाढवणजवळही करण्यात येणार आहे. तर, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने 21 एप्रिल रोजी ट्विट केल्यानुसार मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये बुलेट ट्रेन स्थानकाचे काम जवळपास 75 टक्के पूर्ण झाले आहे. NHSRCLच्या प्रवक्तानुसार, स्थानकासाठी आवश्यक असलेल्या 18,772,63 क्यूबिक मीटर जमिनीत जवळपास 14 लाख क्यूबिक मीटर जमीनीचे खोदकाम करण्यात येत आहे. 

बुलेट ट्रेन कधी सुरू होणार?

बुलेट ट्रेन सुरू होण्यासाठी आणखी तीन वर्ष लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2028 पर्यंत बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. 

तीन तासांत मुंबई ते अहमदाबाद 

508 किमी लांबीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अहमदाबाद ते मुंबई दरम्यान वेळेची बचत होऊन 6 ते 8 तासांनी कमी होऊन फक्त 3 तासांत पूर्ण होणार आहे. 2026मध्ये सूरत आणि दक्षिण गुजरातच्या बिलिमोरा दरम्यान 50 किमी मार्गावर बुलेट ट्रेनची पहिली चाचणी होणार आहे. या कॉरिडोरवर एकूण 12 स्थानके असणार आहेत. मुंबईत भूमिगत स्थानक असणार आहे. तर ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमतीमध्ये एलिवेटेड स्थानक बनवण्यात येणार आहेत. 

जवळपास 1.1 लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2017 मध्ये अहमदाबादच्या साबरमतीमध्ये भूमीपूजन केले. जपान सरकार या प्रकल्पासाठी 0.1 टक्के व्याजदराने 88,000 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी 50 वर्षांचा वेळ भारताकडे असणार आहे. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

win999 slot