मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली गणबोटे कुटुंबीयांची भेट: शोक व्यक्त करत केले सांत्वन, कौस्तुभ गणबोटेंचा पहलगाम हल्ल्यात झाला होता मृत्यू – Pune News



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या पुण्यातील निवासस्थानी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा पहलगाम येथील दहशवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी दोघांच्या कुटुं

.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दुपारी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष केले. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांसह 26 पर्यटक मारले गेले. यात डोंबिवली येथील 3, पुण्यातील दोन, तर पनवेल येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. पुण्यातील संतोष जगदाळे व कौस्तुभ गणबोटे या दोन बालमित्रांचाही मृतांत समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी गणबोटे कुटुंबीयांची भेट घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

सहा परिवारांना हवी ती मदत सरकार करेल​​​​​​​

गणबोटे आणि जगदाळे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. हा प्रसंग अतिशय भावूक होता. सगळेच निशब्द होते. आसावरी जगदाळे यांनी ज्याप्रकारे तेथील वर्णन केले, ते ऐकून कुणाचेही मन हेलावून जाईल आणि कुणाचेही रक्त पेटेल, असे ते वर्णन होते. दोन्ही परिवारासोबत जे काही झाले, ते अनाकलनीय आहे. त्यांचा अनुभव ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा आपला जो निर्धार आहे, तो अजून मजबूत झालेला आहे. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या सहा जणांच्या परिवारांना ​​​​​​​हवी ती मदत सरकार करेल, असे ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ज्यांना झोपेचे सोंग घ्यायचे ते सोंग घेतील

धर्म विचारून गोळ्या घातल्या याबाबतची सत्यता मला माहीत नाही, असे शरद पवार म्हणाले होते. याबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारले असता, कोण काय म्हणाले, या वादात मला पडायचे नाही. ही वाद करण्याची वेळ नाही. पीडित कुटुंबीयांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. ज्यांना मान्य करायचे ते मान्य करतील, ज्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचे सोंग घ्यायचे असेल, ते झोपेचे सोंग घेतील. मी त्यांचे वक्तव्य ऐकले नाहीत. त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

त्यांना हिंदू असल्याने मारण्यात आले, मला सत्य माहित नाही: शरद पवार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील दोन दिवसांपूर्वी कौस्तुभ गणबोटेंच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अतिरेक्यांनी पर्यटकांना धर्म विचारून मारल्याची बाब आपल्याला माहिती नसल्याचा दावा केला होता. हिंदू आहेत म्हणून अतिरेक्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या असे म्हणतात. पण यात सत्य काय आहे याची मला कल्पना नाही. पण तिथे जे लोक होते, त्यातील स्त्रियांना सोडले. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आम्हा महिलांना हात लावला नाही. त्यांनी केवळ आमच्या पुरुषांना हात लावला, असे शरद पवार म्हणाले होते.

​​​​​​​हे ही वाचा…

महाराष्ट्रात 48 शहरांत 5023 पाकिस्तानी:नागपुरात सर्वाधिक 2458 जण, 107 बेपत्ता; तुमच्या जिल्ह्यात किती पाक नागरिक? वाचा

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर केंद्राने देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वच राज्यांना यासंबंधीचे दिशानिर्देश दिलेत. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारही यासंबंधीची पाऊले उचलत असताना राज्यातील 48 शहरांत तब्बल 5023 पाकिस्तानी नागरिक आढळल्याचा दावा राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर:48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहणार नाही याची काळजी घेतली जाईल – CM देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *