आधुनिकतेच्या पाठीमागे जाताना आपण निसर्गापासून दूर गेलो असे प्रतिपादन भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांनी केले. सह्याद्री देवराई व भारती विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिल्या दोन दिवस
.
हे प्रदर्शन भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलात दोन दिवस खुले असणार आहे. या प्रदर्शनात देवराईची संक्षिप्त प्रतिकृती, विविध कडधान्य व पालेभाज्यांच्या बियांचे प्रदर्शन, विविध वनस्पतीचे बीज रोप व पानाचे प्रदर्शन, बियांची बाराखडी व वर्णमाला, विविध वनस्पतीच्या कंदांचे प्रदर्शन, आदर्श पाणवठ्याची प्रतिकृती, निसर्गावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन, पालखी मधील वृक्ष दिंडी, जुन्या कपड्यांपासून उपयोगी पिशव्यांचे प्रदर्शन अशी विविधप्रकारची प्रदर्शने आहेत.
डॉ. जगताप म्हणाल्या, भारती विद्यापीठाने नेहमीच पर्यावरण रक्षण, जागृती आणि संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. भारती विद्यापीठाच्या पर्यावरणविषयक संस्थेने आजवर केलेले काम देशभर वाखाणले गेले आहे. या महत्त्वाच्या उपक्रमात सहभागी होताना आनंद होत आहे.
सयाजी शिंदे म्हणाले, या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश राज्यातील शाळा आणि महाविद्यालय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निसर्ग आणि पर्यावरणाची गोडी लावणे, त्यांना केवळ भाषण न देता कृतिशील सहभाग घ्यायला लावणे. तसेच आपल्या झाडांची आणि बियांची ओळख करून देणे, ती झाडं वाढवण्यासाठी त्यांच्या देखभालीसाठी विद्यार्थ्यांसोबत सक्रिय राहणे हा आहे. सचिन चंदने यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.