Rare White Leopard Cub: बिबट्या म्हटलं की नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण असतं. बिबट्या धुमाकूळ घालतो, गाय, कुत्र्यांवर हल्ला करतो, असं चित्र असतं. पण वन्यप्रेमी बिबट्याच्या भावविश्वाशी परिचित असतात. त्याची हालचाल, स्वभाव प्रत्येक गोष्टींबद्दल त्यांना उत्सुकता असते. तुम्हीदेखील बिबट्याबद्दल उत्सूक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्याचे दुर्मीळ पांढरे पिल्लू आढळून आले. या पिल्लांची आईसोबत पुनर्भेट झाली असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. दरम्यान हे पिल्लू ‘ल्युकिस्टिक’ आहे की ‘अल्बिनो’ हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण या पिल्लाचे डोळे अजूनही उघडलेले नाही मात्र, महाराष्ट्रात प्रथमच बिबट्याचे पांढऱ्या रंगाचे पिल्लू आढळून आले आहे.
मादीने पिल्लांना दुसऱ्या ठिकाणी हलवले
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावात बुधवारी काजू लागवडीसाठी झाडे तोडण्याचे काम सुरू होते. सकाळी झाडे तोडण्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर मजुरांना बिबट्याची दोन पिल्लं आढळून आली. त्यातील एक पिल्लू नियमित रंगाचे तर दुसरे पिल्लू पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे होते. या पिल्लांचे डोळे देखील उघडलेले नव्हते. मजुरांनी लागलीच या पिल्लांची छायाचित्र टिपली. मात्र शेजारीच असणाऱ्या मादीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यामुळे घाबरलेली मंडळी तिथून दूर झाली. त्यांनी यासंबंधीची माहिती रत्नागिरी वन विभागाला उशिराने कळवली. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होईपर्यंत मादीने पिल्लांना दुसऱ्या ठिकाणी हलवले होते.
बिबट्याचा आधिवास
हिमालयीन संस्कृतीत स्नो लेपर्डला पवित्र आणि रहस्यमय प्राणी मानले जाते. स्थानिक लोककथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. पांढरा बिबट्या स्नो लेपर्ड (Snow Leopard) असेही म्हणतात, हा हिमालयासारख्या उंच पर्वतीय भागात आढळणारा एक दुर्मीळ आणि सुंदर प्राणी आहे. त्याचा वैज्ञानिक नाव Panthera uncia आहे. याचा फर पांढरा किंवा राखाडी-क्रीम रंगाचा असतो. ज्यावर काळे ठिपके असतात. हा फर त्याला बर्फात लपण्यास मदत करतो. हिमालय, तिबेट, मंगोलिया, आणि मध्य आशियाच्या उंच पर्वतांमध्ये 3,000 ते 5,500 मीटर उंचीवर हा बिबट्या आढळतो.
25 ते 75 किलो पर्यंत वजन
या बिबट्याची लांबी साधारण 1.8 ते 2.3 मीटर (शेपटीसह) असते. याचे वजन 25 ते 75 किलो पर्यंत असते. हा बिबट्या मांसाहारी असतो. प्रामुख्याने निळ्या मेंढ्या (भरल), आयबेक्स, हरण, आणि लहान प्राणी हे त्याचे भक्षक असतो. स्नो लेपर्डना एकटे राहायला आवडते. ते उत्कृष्ट चढाई करतो. तसेच रात्री किंवा पहाटे जास्त सक्रिय असतो.
स्नो लेपर्डची संख्या कमी होण्याची कारणे
स्नो लेपर्डची सध्याची संख्या अंदाजे 4 हजार ते 6 हजार 500 इतकी आहे. सध्या यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसतेय. अधिवास नष्ट होणे, अवैध शिकार, आणि मानव-प्राणी संघर्ष हे स्नो लेपर्ड कमी होण्याचे मुख्य कारण आहे. असे असले कतरी WWF आणि स्नो लेपर्ड ट्रस्टसारख्या संस्था त्यांच्या संरक्षणासाठी काम करतात.