पर्यटकांच्या मदतीसाठी महायुती सरकारमध्ये चढाओढ? शिंदे-महाजनांचं वेगवेगळं बचावकार्य!


Pahalgam Terrorist Attack: काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना आणण्यावरुन महायुती सरकारमध्येच चढाओढ सुरु असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मदत व पुनर्वसनमंत्री गिरीश महाजन श्रीनगरमध्ये जाण्याअगोदरच एकनाथ शिंदेंनी श्रीनगरमधून बचावकार्य सुरु केलंय. शिंदे समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप शिवसेना UBTनं केलाय. तर विरोधकांच्या या टीकेचा सरकारनं समाचार घेतलाय.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेले हजारो पर्यटक तिथंच अडकून पडलेत. या सगळ्या मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकारी पातळीवर तातडीनं हालचाली सुरु झाल्यात. उपमुख्य़मंत्री एकनाथ शिंदे विशेष विमानानं श्रीनगरमध्ये गेले. त्यापूर्वीच श्रीकांत शिंदेंचे काही कार्यकर्ते श्रीनगरमध्ये मराठी माणसांच्या मदतीसाठी लागले होते.

दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना श्रीनगरमध्ये पाठवलंय. त्यांनीही मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात धाडण्यासाठी व्यवस्था केलीये. शेवटचा मराठी माणूस महाराष्ट्रात जाईपर्यंत श्रीनगरमध्ये थांबण्याचा त्यांनी निर्धार केलाय. एकाच महायुती सरकारचं एकत्र बचावकार्य अपेक्षित होतं. पण शिवसेना आणि भाजपचं वेगवेगळं बचावकार्य सुरु असल्याचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संजय राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊतांनी केलेल्या टीकेला पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. विरोधक मराठी माणसाच्या मदतीतही राजकारण करत असल्याचा पलटवार गुलाबराव पाटलांनी केलाय. महायुती सरकार एकदिलानं एकजुटीनं मदतकार्य करत असल्याचं खासदार नरेश म्हस्केंनी सांगितलंय.

मदतीच्या कामात कुणी राजकारण करु नये असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिलाय. सत्ताधा-यांच्या उणिवा काढणं हे विरोधकांचं कामच आहे. मराठी पर्यटकांच्या बचावकार्यातही महायुतीत नसलेली एकी विरोधकांना ठळकपणं जाणवली.. तोच मुद्दा विरोधकांनी उपस्थित केलाय.

मदतीवरुन शिवसेना विरुद्ध शिवसेना 
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शिवसेनेनं श्रीनगरमध्ये मदतकार्य़ सुरु केलंय. या मदतकार्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही नेता दिसत नसल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केलाय. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा एकही नेता मुंबई विमानतळावरही दिसला नसल्याचा आरोप पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटलांनी लगावलाय.एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय. मराठी माणसांना मदत न करता घरात बसून बोलणं सोप्पं असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय.शिवसेनेनं मराठी माणसांना श्रीनगरमधून आणण्यासाठी विमानं पाठवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं चार सीटर गाडी तरी पाठवली का असा सवालही शिवसेनेंनं विचारलाय.शिवसेना फुटल्यापासून दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. श्रीनगरमधील मदतीच्या मुद्यावरही ठाकरेंच्या शिवसेनेनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्याची संधी सोडली नाही. पण या टीकेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरच बुमरँग झालंय.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

casino games mobile