लग्नानंतर वर्षभराच्या आतच सासरचे व्यक्ती मानसिक व शारिरिक छळ करुन घर बांधणीकरिता पाच लाख रुपये माहेरहून घेऊन ये असा तगादा लावत वारंवार भांडण करत असल्याचा प्रकार एका विवाहितेच्या बाबतीत घडत होता. अखेर या जाचास कंटाळून २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी
.
याबाबत फुरसुंगी पोलिस ठाण्यात मयत महिलेच्या ४६ वर्षीय वडीलांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, तिचा पती आकाश विलालास करनुरे, सासरे विलास करनुरे, सासू शोभाबाई विलास करनुरे (४८) व नणंद प्रियांका सलगर (३२) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत २१ वर्षीय महिला व आकाश यांचे ८/८/२०२४ रोजी थाटामाटात लग्न झाले होते. त्यानंतर विवाहिता सासरी नांदत असताना किरकोळ कारणावरून तिचे सासरचे व्यक्तींनी छळ सुरु केला. तिला शिळे जेवण देवून तिचा मानसिक व शारिरिक उळ करण्यात येत होता. तसेच तिच्याकडे वारंवार घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये माहेरहून घेऊन ये असा तगादा देखील लावला. तिच्याशी वारंवार भांडण करुन तिला त्रास दिल्याने तिने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या आत्महत्येस प्रवृत्त ठरल्याने पती,सासू, सासरे, नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस नलवडे याबाबत पुढील तपास करत आहे.
मतिमंद मुलीवर बलात्कार
कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय जन्मजात मतिमंद असलेल्या मुलीचा मतिमंद पणाचा फायदा घेऊन तिचे सोबत मागील दोन वर्षापासून एक तरुण जबरदस्तीने शारिरिक संबंध करत होता. तसेच तिच्यासोबत त्याने अनैसर्गिक संभोग देखील केला होता व सदरचा प्रकार कोणास सांगू नये याकरिता तिला मारहाण करुन धमकावले देखील होते. परंतु हा प्रकार तिच्या कुटुंबियांना समजल्यावर त्यांनी याबाबत आरोपी महेश पासवाश्न (वय- २५,रा. चंदवतपूर गोंडा, उत्तरप्रदेश) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.