पर्यटकांवर अंदाधूंद गोळीबार…; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा थरारक व्हिडिओ समोर


Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर पहलगाम येथील हल्ल्यानंतरचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याच दरम्यान हल्ल्याचा एक लाइव्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बंदूकधारी व्यक्ती पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करत आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळावरुन बचावलेल्या पर्यटकांचे व्हिडिओ समोर येत होते. यात एक महिला रडत रडत बोलताना दिसत आहे. तर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक दहशतवाद्याच्या हातात ऑटोमॅटिक गन आहे आणि पहलगाम येथील मैदानात पर्यटकांवर गोळीबार करताना दिसत आहे. या दहशतवाद्याने बॉडिकॅम परिधान केले होते. हल्लेखोराने या संपूर्ण हल्ल्याची व्हिडिओग्राफी केली होती. दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुषांना वेगवेगळे केले आणि त्यानंतर फक्त पुरुषांवर गोळ्या चालवल्या. काही लोकांना जवळून गोळ्या मारण्यात आल्या तर काहींना लांबून गोळ्या झाडण्यात आल्या. 

आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलं की, दहशतवाद्यांनी जाणूनबूजून पहलगाम हे ठिकाण हल्ल्यासाठी निवडलं. तेथे कोणीही सुरक्षारक्षक तैनात नव्हते आणि हल्ल्याच्यावेळी नागरिकांना मदत मिळणे कठिण जाईल. दहशतवाद्यांनी लपण्यासाठी घनदाट जंगलाचा आधार घेतला होता. 

पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. पहलगामच्या बैसारन घाटीमध्ये करण्यात आला होता. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

15,000 जणांनी रद्द केले काश्मीरचे विमान तिकीट

पहलगाम येथील हल्ल्यानंतर किमान 15 हजार लोकांनी काश्मीर पर्यटनाचा बेत रद्द करीत बुधवारी विमानांचे तिकीट रद्द केले आहे. इंडिगोकडे 7,500 एअर इंडियाकडे 5,000 तर स्पाइसजेटकडे 5,5०० विनंती अर्ज आले आहेत. ज्या पर्यटकांना तिकीट रद्द करायचे आहे त्यांना 100% परतावा तर ज्यांना तिकिटाचे पुनर्नियोजन करायचे आहे त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ते करून देण्याची घोषणा विमान कंपन्यांनी केली आहे. हल्ल्यानंतर तिकीट रद्दचे प्रमाण सातपट अधिक वाढले आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

slots best