उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटतात. यामुळे तहानेने व्याकूळ होणारे वन्यप्राणी सैरावैरा होतात. पाण्याच्या शोधात ते मानवी वस्तीकडे येतात. या प्रकारातून मानव व वन्यजीवांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात जंगलांमध्ये कृत्रिम पाणवठे
.
जळगाव येथील सातपुडा पर्वतराजीत दुर्मीळ वन्यजीवांचा अधिवास आहे. त्यापैकी तापी-पूर्णाच्या खोऱ्यातील वडोदा वनक्षेत्राला मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा आहे. या जंगलात पट्टेदार वाघ असल्याने वन विभागाला त्यांच्या संरक्षणासाठी नेहमीच अलर्ट राहावे लागते. दरम्यान, उन्हाळ्यात या जंगलामधील नैसर्गिक जलस्रोत (पाणवठे) आटतात. यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करतात. त्यांना फेब्रुवारी ते जुलै या कालावधीत जंगलातच पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे. अधिवास सुरक्षित राहावे यासाठी वडोदा वनक्षेत्रात आधीपासून २० पाठवणे होते. पैकी १२ सुस्थितीत होते. वन परिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे यांनी त्यात २० नवीन पाणवठ्यांची भर घातली. या एकूण ३२ पाणवठ्यांमध्ये काही नैसर्गिक स्रोत आहेत. मात्र कृत्रिम पाणवठ्यांमध्ये एका महिन्यात चार ते पाच वेळेस टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. काही नादुरुस्त पाणवठ्यांची लवकरच दुरुस्ती करणार असल्याचे आरएफओ साळुंखे यांनी सांगितले.