महाराष्ट्राला हादरवणाऱ्या तुळजापूर ड्रग्स रॅकेट प्रकरणात मोठी घडामोड, ‘त्या’ पुजाऱ्यांना आता…


Tuljapur Drugs Case: महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळाभवानीच्या दारातच ड्रग्सचे रॅकेट सुरू असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात मंदिरातीलच 11 पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले होते. आता या प्रकरणात मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणातील पुजाऱ्यांच्या विरोधात मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात गेल्या 3 वर्षांपासुन ड्रग्ज तस्करी सुरु असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई कठोर केली आहे.  राज्यभरात हे जाळं पसरलंय का त्या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे. याच दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत पुजाऱ्यांचेही कनेक्शन समोर आले होते. त्यामुळं संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. 

ळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात सहभाग असणाऱ्या पुजाऱ्यांना आई तुळजाभवानीची पूजा करता येणार नाही. पाळीकरांच्या यादीतून या पुजाऱ्यांची नावे कमी करावीत अशा सूचना मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा धाराशीवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिल्या आहेत. मंदिर संस्थांनचे अधिकारी व पुजारी मंडळाची बैठक घेऊन जिल्हाधिकारी यांनी या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे ड्रग्ज तस्करी प्रकरणातील पुजाऱ्यांना तुळजाभवानीची पूजा करता येणार नाही.

ड्रग्ज प्रकरणातून निर्दोष मुक्तता होईपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. तुळजापूर ड्रग्स प्रकरणात 14 पुजाऱ्यांचा सहभाग असल्याच उघड झाला आहे. या पुजाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टात चार्जशीटदेखील दाखल आहे. पुजाऱ्यांच्या ड्रग्स तस्करी सहभागामुळे तुळजाभवानीचे भक्त मात्र चांगले संतापलेत. प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याने आता पुजाऱ्यांची धाबे दणाणले आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

s5 slot