सीमा भागातील लष्करी वैद्यकीय रुग्णालय अद्ययावत करण्यात येत आहेत. तसच श्रीनगर मधील लष्करी रुग्णालय उत्कृष्ट सेवा देत आहे, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक व्हाइस ऍडमिरल आरती सरीन यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. पुण्यातील
.
या संचलनाच नेतृत्व सौरभ सिंग यादव याने केलं. सुरुवातीला छात्र कदमताल करत कॅप्टन देवाशीष शर्मा मैदानात दाखल झाले. संचलनाच्या प्रमुख पाहुण्या व्हाइस ऍडमिरल आरती सरीन यांचं मैदानात आगमन झालं आणि त्यांनी संकलनाची पाहणी केली. छात्रांच्या दिमाखदार संचलना नंतर छत्रांना सैन्यदलात अधिकारी म्हणून दाखल करून घेण्याचा सोहळा पार पडला आणि त्यांना लष्करी वैद्यकीय सेवेची शपथ देण्यात आली.
संचलन सोहळ्याला संबोधित करताना सरीन म्हणाल्या की, वैद्यकीय सेवेतील छात्र आज लष्करी सेवेत दाखल झाले असून तुम्ही आता फक्त डॉक्टर नाही तर गणवेशातील अधिकारी तसच समाजाचे मार्गदर्शक आहात. देशाला सर्वोच्च प्राधान्य देऊन जबाबदारी आणि निष्ठेने काम करावं अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही आता भारतीय सैन्य दलातील एक अधिकारी आहात ही एक मोठी जवाबदारी आहे. तुम्ही कसे वागता आणि काय निर्णय घेता यावरून तुमची सैन्य दलातील भुमिका स्पष्ट होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवली आहे. मात्र वैद्यकीय सेवेतील मानवी सहभाग वगळता येणार नाही. यावेळी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि डेप्युटी कमांडंट मेजर जनरल गुरुराज सिंग, महाविद्यालयाचे संचालक आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल पंकज पुरुषोत्तम राव उपस्थित होते.
या संचलन सोहळ्यात फ्लाइंग ऑफिसर पोईला घोष सहभागी झाली होती. लष्करती दाखल होणारी घोष परिवारातील ती तिसरी पिढी आहे. तिचे वडील निवृत्त कर्नल अजितकुमार घोष आणि कर्नल प्रतिभा मिश्रा हे पण लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. पोईला वैद्यकीय सेवेत दाखल झाली याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
