काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे स्वरूप बदलले: पर्यटक हिंदूंना लक्ष्य करून केलेला हल्ला पूर्वनियोजित, लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांचे विश्लेषण – Pune News



जम्मू-काश्मीर मध्ये मी १७ वर्ष सेवा केली आहे. पाकिस्तानचे चीफ ऑफ अर्मी स्टाफ यांनी मागील आठवड्यात एक व्यक्तव्य केले की, काश्मीर साेबत आम्ही नेहमीच आहे. काश्मीर मध्ये काही झाले की त्या गाेष्टी त्यांच्या पथ्यावर पडतात. कलम ३७० काश्मीर मध्ये गेल्यानंतर

.

निंभाेरकर म्हणाले, जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम येथे झालेला भ्याड हल्ला लगेच घडला असे हाेत नाही. त्यामागे निश्चित काहीतरी नियाेजन करण्यात आले आहे. हल्ला करण्यासाठी सुरुवातीला संबंधित भागाची रेकी करावी लागते. वाट पाहून नियाेजन करावे लागते. स्थानिक व्यक्तीची देखील मदत याकामी घेतली जात असते. पहलगाम मधील बॅसलाेर व्हॅली येथे हल्ला झाला पण दहशतवाद्यांना जी मदत मिळाली ती अवंतीपुरा मागे तराल या भागात मिळाली असण्याची शक्यता आहे. त्याभागात अनेक दहशतवाद निर्माण झालेले आहे. संबंधित हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना दीड ते दाेन महिने कालावधी लागला असावा. हल्ला करुन परत जाण्याचे देखील नियाेजन हल्लेखाेर करतात. हल्ला झालेल्या ठिकाणी येण्यासाठी वेगवेगळया भागातून रस्ते येतात. घुसखाेरी सीमावर्ती भागातून हाेत असले तरी गुलमर्ग ते साेनमार्ग दरम्यान सीमावर्ती भागात थंडीच्या काळात बर्फामुळे घुसखाेरी हाेण्याचे प्रमाण बहुतांश असते. गुहा, जंगलात जाऊन हल्लयानंतर आराेपी लपून राहू शकतात. आपले खबरे चांगले असतील तरच दहशतवादीबाबत माहिती मिळून त्यांचेवर पुढील कारवाई हाेऊ शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

top game slots