केडगाव परिसरातील पाणीपुरवठा हा पूर्ण क्षमतेने देऊन २ दिवसांआड पाणी सोडण्यात यावे व पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केडगाव येथील नागरिक व श्री. गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टतर्फे करण्यात आली.
.
याप्रसंगी श्री. गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष महेश सरोदे, बापूसाहेब कोतकर, नवनाथ लोंढे, पांडुरंग कोतकर, मनोहर बगळे, केदार सर, महादेव सातपुते, सचिन कोतकर, अभी ठूबे, ऋषिकेश ठुबे, संदीप भांडारकर, गोरख हुलगे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केडगाव उपनगर भागात ५ ते ६ दिवसांनंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो, मात्र हा पाणीपुरवठा कमी दाबाने होऊन कमी वेळेपुरता चालू असतो. त्यामुळे अनेक घरांना पिण्याचे पाणी भेटत नाही. पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांमध्ये रोष निर्माण झाला आहे. महानगरपालिकेद्वारे पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे.
या वाढीव पाणीपट्टीबाबत विचार करण्यात यावा व केडगाव परिसरात उच्च दाबाने व २ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.