Maharashtra Weather Today: उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळत आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिली आहे. तर उर्वरित राज्यातही उन्हाची काहिली कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने मराठवाडा आणि कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. आजचे हवामान कसे असेल जाणून घेऊया.
बिहार आणि आजूबाजूच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून छत्तीसगड, पूर्व विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या अखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. त्यामुळं राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. उकाड्यातही वाढ झाली आहे. विदर्भात पारा तर 45 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळं दहा उष्ण शहरात विदर्भातील पाच शहरे आहेत.
आज विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसंच, कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम असणार आहे.
उष्ण तापमान वाढीमुळे गव्हाचा दर्जा खालावला
यंदा थंडी कमी होती त्यामुळे गव्हाची वाढ पूर्णपणे झाली नाही त्यामुळे हलक्या प्रतीच्या गावांचे आवक जास्त होत आहे. त्यामुळे गव्हाला कीड लागण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वातावरणाचा फटका गव्हाला बसल्याने पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये गव्हाची आवक कमी झाली आहे. 15 एप्रिल नंतर गव्हाची आवक होती मात्र यंदा 15 मार्च नंतर गव्हाची आवक सुरू झाली. सध्या गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान येथूनच गहू येतोय.
महाराष्ट्रातील मंगळवारचे तापमान
विदर्भात सर्वाधिक तापमान पुन्हा चंद्रपूरमध्ये.
चंद्रपूर –45.8
ब्रह्मपुरी –45.2
नागपूर -44.2
अकोला— 44.8
अमरावती–44.4
यवतमाळ -44.0
वर्धा –44.2
वाशिम-43.5
गडचिरोली-44. 0
बुलडाणा –40.4
गोंदिया-42.7
मराठवाडा – तापमान
छत्रपती संभाजीनगर – 40.9
धाराशिव – 39
जालना – 42
नांदेड – 42
परभणी – 42.2
बीड – 41.7
लातूर – 39
हिंगोली – 43
कोकण – तापमान
मुंबई शहर जिल्हा – 33.4
मुंबई उपनगर जिल्हा- 33.6
ठाणे जिल्हा – 35
पालघर जिल्हा-34
रायगड जिल्हा-32
रत्नागिरी जिल्हा- 33.8
सिंधुदुर्ग जिल्हा- 32
उत्तर महाराष्ट्रातील – तापमान
नाशिक – 38.4
नंदुरबार: 40
धुळे: 41
जळगाव- 42
पश्चिम महाराष्ट्र- तापमान
सांगली, 37.7
सातारा, – 39.3
कोल्हापूर,35.8
अहमदनगर , 38
पुणे,38
सोलापूर – 43