सबंध भारत देशामध्ये एचटीबीटी या कापूस बियाण्याचे कुठेही विक्रीसाठी परवानगी नसताना चुंचाळे (ता. चोपडा) या गावी मात्र एकाने तब्बल हजारो पाकीट कापसाचे बोगस बियाणे विक्रीसाठी आणले होते. याबाबतची गुफ्त माहिती मिळाल्यावर आज दि. २२ रोजी दुपारी १२ वाजेच्या स
.
कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाला चुंचाळे गावात एसटीबीटी हे कापूस वान बोगस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्या आधारावर जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, मोहीम अधिकारी विजय पवार, प स चोपडा येथील तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, विद्या इंगळे, प्रकाश मथुरे, समा तडवी या पथकाने चुंचाळे गावात जाऊन चुंचाळे अकुलखेडा रोडवरील नितीन नंदलाल चौधरी यांच्या गोडाऊनवर तब्बल १ हजार २७३ बोगस कापसाचे बियाणे पाकीट मिळून आले आहेत.
यामध्ये एका पाकिटाची किंमत एक हजार ४०० रुपये एवढी असून एकूण किंमत १७ लाख ८२ हजार रुपये रकमेचा मुद्देमाल कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने जप्त केला आहे. नितीन नंदलाल चौधरी यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय जितेंद्र वल्टे करीत आहेत.