पुण्याजवळ अद्धभूत चमत्कार! पाण्याबाहेर आले उजनी धरणात बुडालेले महाराष्ट्रातील हजारो वर्ष जुनं पळसनाथ मंदिर


Pune Palasnath Temple : पुण्याजवळ अद्धभूत चमत्कार पहायला मिळत आहे.  उजनी धरणात बुडालेले महाराष्ट्रातील हजारो वर्ष जुनं पळसनाथ मंदिर पाण्याबाहेर आले आहे. उजनी जलाशयातील श्री पळसनाथाच्या प्राचीन मंदिराचे सप्तभूमीज शिखर पाण्याबाहेर आले आहे.  

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक अद्भुत दृश्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावातील पाण्यात बुडालेलं श्री पळसनाथाचं प्राचीन मंदिर सध्या पाण्याबाहेर आलं आहे. या मंदिराचं सप्तभूमिज शिखर दिवस उगवताना आणि मावळताना सोनेरी सूर्यप्रकाशात झळकतंय महामार्गावरून जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

मागील वर्षीही हे मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आलं होतं. त्या काळात नागरिकांनी प्राचीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुन्याचा अनुभव घेतला आणि धार्मिक कार्यक्रमही पार पडले. पण त्यानंतर पडलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरण 100% भरल्यानंतर हे मंदिर पुन्हा पाण्याखाली गेलं आता उजनीतील पाणी पातळी कमी होऊन मायनस मध्ये धरण असल्याने या मंदिराचं शिखर उघडे पडले आहे.

मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं जुनं वास्तुशिल्प. चुना, भाजलेल्या विटा, पाषाणी शिळा, पंचशाखीय प्रवेशद्वार, त्यावरील नक्षीकाम… व्याल, पद्मपत्र, शिल्पपट, दशावतार यांसारख्या कोरीव मूर्ती या सर्व गोष्टी प्राचीन भारताच्या स्थापत्य परंपरेचं दर्शन घडवतात
पळसनाथाचं हे मंदिर केवळ श्रद्धेचं नव्हे, तर कलेचंही प्रतीक आहे. मात्र हे सौंदर्य फक्त मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आल्यानंतरच पाहायला मिळतं. सध्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आल्याने मंदिर पुन्हा एकदा पाण्याबाहेर आले आहे. धरणातील पाणी साठा आणखी कमी झाल्यास हे मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर येवू शकते. 

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24