नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देशभरात जेईई मेन परीक्षा घेण्यात आली.आयआयटी,,एनआयटी, प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी जेईई मेन ही महत्वपूर्ण प्रवेश परीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे.
.
जेईई परीक्षेत पुण्यातील आयुष चौधरी देशात सातवा आणि राज्यात पहिला आला आहे. याबाबत त्याच्यासह पालकांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. सर्व शिक्षक यांनी विद्यार्थी यांच्याकडे वैयक्तिक लक्ष्य देऊन त्यांच्या प्रगतीकडे सातत्याने लक्ष्य ठेवले. चांगल्या प्रकारे परीक्षा सराव घेतल्याने यश मिळाल्याची भावना त्याच्या पालकांनी यावेळी व्यक्त केली.
आयुष म्हणाला, जी परीक्षा आहे ती पहिली समजून घेतली पाहिजे त्यानुसार परीक्षा तयारी केली. केवळ पाठांतर करण्यापेक्षा विविध गोष्टी समजून घेतल्या . त्यातून चिंतन वाढते आणि त्याप्रकारे विश्लेषण करून अभ्यासात प्रगती करता आली. निरीक्षण क्षमता वाढवून सराव अधिक प्रमाणात केला . विषयानुसार अभ्यास पद्धत ठरवली त्याचा फायदा झाला. परीक्षा तणाव घेण्यापेक्षा ती इतर परीक्षा सारखी सहजरित्या दिली. सेल्फ स्टडीवर भर देण्यासोबतच आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे. माझ्या कुटुंबाने आणि शिक्षक यांनी मला वेळोवेळी पाठिंबा दिल्याने आज हे यश मिळाले आहे.आयआयटी मुंबई मध्ये पुढे मी शिक्षण घेणार आहे.