Sanjay Raut On Marathi Bhasha: महाराष्ट्रात अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करण्यात आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज ठाकरेंनीही ट्विट करत ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही असं राज ठाकरेंनी बजावलं आहे. त्यानंतर आता संजय राऊतांनीही सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर राज ठाकरेंनाही टोला लगावला आहे.
संजय राऊतांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत हिंदी भाषा सक्तीबाबत सविस्तर भाष्य केलं आहे, ‘बेळगावत मराठी भाषेवर इतका अत्याचार होतं असताना भाजपच्या लोकांनी तोंड वर केलं आहे का. हिंदीला घटनात्मक वैधता नसली तरीही हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका. त्यांची सोय करु नका. हे बरोबर नाही. या महाराष्ट्रातून हिंदी सिनेमा, हिंदी गाणी, हिंदी साहित्य, नाटक यांचा उगम झाला आहे. जिथे हिंदी नाही तिथे सक्ती करा, असं राऊतांनी म्हटलं आहे.
‘केंद्र सरकारची हिंदी प्रचार समिती आहे. लोकांना हिंदीविषयी प्रेम आहे कारण ती संवाद भाषा आहे. ती तुम्ही अभ्यासक्रमात लादू नका. हिंदी यायला पाहिजे, पण अभ्यासक्रमात लादून विद्यार्थ्यांचे नुकसान करु नका. महाराष्ट्रात सर्वात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मग इंटरनॅशनल असो किवा सीबीएसई मराठी सक्तीची केली पाहिजे. तेवढी हिम्मत तुमच्यात आहे का? ते करावं आधी. नोकरी मिळवण्यासाठी मराठी सक्तीची केली? का ते करावं आणि मग इतर भाषांबाबतीत सक्ती करावी, असं राऊतांनी म्हटलं आहे.
‘कुठलातरी पक्ष हिंदीची मागणी करतो. मग त्या पक्षाच्या वतीने कोणीतरी जावून शिवाजी पार्कवर जाऊन नेत्यांशी चर्चा करतात. दुसऱ्या दिवशी इतकं मोठं एक मराठीत ट्विट येतंय बहुतेक ते कुठल्यातरी सागर बंगल्यावरून ते ट्विट तयार करून आलं होतं. इतकी तत्परता असू शकते का? मराठी विषयी प्रेम आहे आम्हाला. पण ते लादू नका. विद्यार्थ्यांवर ओझ लादू नका. आम्हाला हिंदी शिकवू नका गुजरातला शिकवा,’ असा टोला राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
मनसेने म्हटलं होतं की आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, त्यावरही राऊतांनी टीका केली आहे. ‘कुठून तरी आलेली स्क्रिप्ट वाचू नका. तुम्ही कधी हिंदू झालात कधी हिंदू असतात कधी मराठी असतात काहीतरी ठरवा. सुधाकरासारखा एकच प्याला मधलं बोलू नका, असा टोला मनसेला लगावला आहे.