परभणीच्या मिरखेल गावात 700 वानरांचा उच्छाद, एका आजोबाला अपंगत्व तर चिमुकलीचा मृत्यू


परभणीच्या मिरखेल गावातील गावकरी चांगलेच धास्तावलेत. घरातून बाहेर पडणंही मुश्किल झालंय आणि याचं कारण आहे, गावात घुसलेली वानरांची टोळी. गावात एक दोन नाही तर तब्बल 700 पेक्षा अधिक वानरांनी बस्तान मांडलंय. त्यामुळे गावकरी आता चांगलेच त्रस्त झालेत.

गावात नागरिकांपेक्षा वानरं अधिक
परभणीच्या मिरखेल गावात वानरांचं बस्तान
वानरांच्या हैदोसामुळे गावकरी दहशतीत

रस्त्यावर निवांत बसलेली हि वानरांची टोळी, घर दुकानांवर उड्या मारणाऱ्या वानरांमुळे मिरखेल गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परभणीच्या मिरखेल गावात तब्बल 700 वानरांनी डेरा जमवलाय. गावात पाणी आणि झाडं असल्याने वानरं गाव सोडायचं नाव घेत नाहीयेत. कधी हे वानर घरात शिरून भाकरी पळवतात तर कधी गाड्यांवर उडया मारून नुकसान करतायेत, तारांना लोंम्बकाळून तारा तोडतायेत. एवढचं नाही तर शेतीचंही नुकसना करतायेत. केवळ आर्थिक नुकसानचं नाही तर गावातील एका एका चिमुकलीचा वानरांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. गावात फिरताना अनेकांचा या वानरांनी चावा घेतलाय. धक्कादायक म्हणजे वानराच्या हल्ल्यामुळे देविदासराव देशमुख या आजोबांना कायमच अपंगत्व आलंय.

तर वानरांमुळे गावातील एक दीड वर्षाच्या मुलीला आपल्या जीवाशी मुकावं लागलंय. आपल्या आजीसोबत जात असताना या मुलीवर वानराने हल्ला केला. यात मुलीच्या मानेची नस दबली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मिरखेल गावात गेल्या अनेक वर्षांपासून वानरांनी आपलं बस्तान मांडलंय. गावक-यांनी वनविभागाकडे वारंवार निवेदन देऊनही ढिम्म वनविभाग वानरांचा बंदोबस्त करत नसल्याचा आरोप केला जातोय. वानरांमुळे जिवितहानी झालीये, त्यामुळे आतातरी प्रशासनाने ठोस पाऊल उचलण्याची मागणी होतीये. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24