केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार काँग्रेस नेत्या खा. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सक्त वसुली संचालनालयामार्फत (ईडी) दबाब आणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील
.
वेळी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत बॅंक-खाती गोठवून देखील, जनतेने काँग्रेस पक्षास दुप्पट जागा देऊन मजबूत विरोधी पक्ष केले. देशात काँग्रेस पक्ष विरोधी पक्षाची भूमिका सक्षमतेने बजावत असतांना.. मोदी सरकार ११ वर्षा नंतर देखील स्वातंत्र्य संग्रामात दीपस्तंभाची भूमिका निभावणाऱ्या ‘नॅशनल हेरॅाल्ड वृत्तसंस्थेची व ती स्थापन केलेल्या नेहरू – गांधी कुटुंबाची तथ्यहीन बदनामी करण्याचे कुटील राजकारण’ करत आहेत. पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्रामाविषयी, स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या विषयी असूया स्पष्ट करत असल्याची घणाघाती टिका त्यांनी केली.
यावेळी बोलताना अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘मोदी शासनाने द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने नॅशनल हॅरॉल्ड या वृत्तपत्राची मालमत्ता मनमानी पद्धतीने जप्त केली. तसेच देशाच्या नेत्या खासदार सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी व इतर ज्येष्ठ नेतेमंडळींविरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा लोकशाही परंपरेला घातक आहे. अन्यायकारक निर्णयाच्या विरुध्द आम्ही लक्ष देण्याचे ठरविले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये मुद्दामून नाव बदनाम करून खोट्या गुन्ह्यात अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असून पक्षाचा कार्यकर्ता कदापी शांत राहणार नाही, या विरोधात रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचे काम काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येथून पुढे करतील मोदी सरकारने चुकीच्या पद्धतीने राहुल गांधी यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही शांत बसणार नाही. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला जाईल.
यावेळी माजी गृह राज्य मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे, मुख्तार शेख, गोपाळ तिवारी, नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, अविनाश बागवे, मेहबुब नदाफ, कैलास गायकवाड, प्राची दुधाने, स्वाती शिंदे, प्रियंका रणपिसे, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, कांचन बालनायक, सुंदर ओव्हाळ आदींसह असंख्य काँग्रेस कार्येकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.