देशातील पहिल्या तीन रुग्णालयांमध्ये सह्याद्री हॉस्पिटलचा समावेश: अॅडव्हान्स्ड ब्रेन स्ट्रोक केअरसाठी एनएबीएच प्रमाणपत्र मिळाले – Pune News



पुणे नगर रोड येथील सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला त्यांच्या सुरक्षित आणि उच्च दर्जाची आपत्कालीन सेवा प्रदान करण्याच्या क्षमतेसाठी आणि प्रगत स्ट्रोक सेंटर्ससाठी एनएबीएच प्रमाणपत्र मिळाले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रक्रियांचे कठोर मूल्यांकन केल्यान

.

आज जगभरात ब्रेन-स्ट्रोक हे मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण बनले असून अपंगत्वाचे तिसरे प्रमुख कारण म्हणून समोर येत आहे. आणि दरवर्षी १६० दशलक्ष वर्षांचे निरोगी आयुष्य गमावण्यासाठी जबाबदार ठरते आहे. व्यक्ती, कुटुंबं आणि समाजावर स्ट्रोकचा होणारा परिणाम प्रचंड आहे. स्ट्रोकच्या उपचारांमध्ये “गोल्डन अवर” म्हणजे स्ट्रोकची लक्षणे दिसल्यानंतर पहिल्या 60 मिनिटांचा काळ हा अतिशय महत्वाचा ठरतो. या काळामध्ये केलेल्या त्वरित वैद्यकीय हस्तक्षेपामुळे रुग्णाच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होते. त्यामुळेच रुग्णांसाठी सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर उपचार सेवा देणारे रुग्णालय हे एनएबीएच मान्यता मिळाल्याने राष्ट्रीय मानकांनुसार सर्वोच्च दर्जाचे ठरते.

सह्याद्री रुग्णालय येथे समर्पित न्यूरो आयसीयू आहे. त्याशिवाय येथे मेंदू विकार विभागाचे संचालक डॉ. नसली आर. इचापोरिया यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी स्ट्रोक रुग्णांसाठी एक विशेष टीम आहे. ही टीम स्ट्रोकच्या आपत्कालीन परिस्थितीवर जलद आणि प्रभावी उपचार करण्यात विशेषज्ञ आहे. रुग्णालय थ्रोम्बोलिसिससाठी स्थापित मानकांचा वापर करत स्ट्रोकचे परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करते. या बरोबरच, सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये यांत्रिक थ्रोम्बेक्टोमीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, ज्या रुग्णांच्या मेंदूतील रक्ताच्या गुठळ्या काढण्यासाठी वापरल्या जातात. असे उपचार हे तज्ञ क्लिनिकल टीमद्वारे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून केले जातात.

सह्याद्री हॉस्पिटल्सना जागतिक स्ट्रोक ऑर्गनायझेशन/एंजल्स पुरस्कार समितीकडून देखील मान्यता मिळाली आहे. ही समिती विशिष्ट निकषांनुसार प्रभावी डेटा प्रदान करणाऱ्या आणि उच्च दर्जाची काळजी व उपचार देणाऱ्या रुग्णालयांना पुरस्कार देते. हा पुरस्कार सतत डेटा कॅप्चरिंग आणि विश्लेषणावर भर देणाऱ्या कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्यामुळे ब्रेन-स्ट्रोक रुग्णालय उपचार देताना त्यातील सुधारणा ओळखून त्यावर उपाय करणे शक्य होते.

सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वैद्यकीय संचालक डॉ. सुनील राव म्हणाले, एनएबीएच प्रमाणपत्र मिळवणे म्हणजे केवळ उच्च मानकांची पूर्तता न करता त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करून आरोग्य सेवेत नवीन मापदंड स्थापित करणे. ही मान्यता सह्याद्रीतर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च दर्जाच्या काळजीसाठी तसेच, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी असलेल्या आमच्या अथक समर्पणाचे प्रतिबिंब आहे. भारतातील अशा काही मोजक्या रुग्णालयांपैकी एक होण्याचा आम्हाला अभिमान आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

pagcor regulatory