Pune Deenanath Mangeshkar Hospital Controversy: पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट ससमोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलसह चार हॉस्पिटलही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पुणे पोलिसांनी या चारही हॉस्पिटलची चौकशी केली आणि अहवाल ससून रुग्णालयाला पाठवला आहे. ससून हॉस्पिटलचा अंतिम अहवाल आल्यानंतर पुणे पोलिस कारवाई करणार आहेत.
गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. दोषी डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. र्भवती असलेल्या तनिषा भिसे यांना 28 मार्चला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयाने 10 लाखांच्या अनामत रकमेसाठी तगादा लावला. वेळेवर उपचार न झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचं कुटुंबीयांनी म्हंटलय.
गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून न घेतल्याप्रकरणी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुगालयावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने अहवाल तयार केला आहे.
दरम्यान, दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलसह चार हॉस्पिटलही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 31 मार्च रोजी 12 वाजण्याच्या सुमारास सूर्या हॉस्पिटलमध्ये तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. मात्र, सूर्या हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशालिटी सुविधा नाहीत. असे असतानाही रुग्णालयाने रुग्णाला ऍडमिट कसे करून घेतले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सूर्या हॉस्पिटलदेखील संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सूर्या हॉस्पिटलवर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे.