शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा नाशिक येथे पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या मेळाव्यात शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषण ऐकवण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आभासी भाषणातून शिवसेना शिंदे गटा
.
मी उद्धव ठाकरे साहेबांना एवढेच सांगू इच्छितो नाशिकचे हे शिबिर फक्त नाशिकच्या शिवसैनिकांमुळे यशस्वी झाले आहे. आज आपल्याकडे सत्ता नाहीये, त्यामुळे असे कार्यकर्ते कसे होऊ शकतात असा प्रश्न पडतो. पण हीच खरी शिवसैनिकांची ताकद आहे. आज आपला इथे कार्यकर्म सुरू असताना त्यांनी बाहेर काय केले? दर्गा पाडण्याचे काम केले. शहरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण आपण हे शिबिर यशस्वी करून दाखवले आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आजच्या शिबिराने आपण दाखवून दिले आहे की शिवसैनिक अजूनही खंबीर आहे. यापेक्षा वाईट काळ आपण पहिला आहे. जो सर्वात वाईट काळ बघतो तोच पुढे चांगले भविष्य बघू शकतो. छावा चित्रपटातून आपण छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष पहिला, तो संघर्ष आपल्या वाटेला आलेला आहे. संभाजी महाराजांकडे कवी भूषण होता. मन के जिते जीत है, मन के हारे हार, हार गये जो बिना लडे उनपर हें धिक्कार.. असे म्हणत संजय राऊत यांनी चित्रपटातील कवि कलश यांची कविता वाचून दाखवली.
नाशिकच्या पराभवाचे विश्लेषण वॉशिंग्टनला झाले
नाशिकचा पराभव का झाला, उद्धाव साहेब नाशिकच्या पराभवाचे विश्लेषण जर कोणी केले असेल तर ते वॉशिंग्टनला झाले. सिस्टर तुलसी असे पंतप्रधान मोदी यांना म्हणतात. या सिस्टर तुलसी गुप्तचर विभागामध्ये प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते आणि निकाल बदलले जाऊ शकतात. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी हे सांगितले आहे. मोदी जेव्हा अमेरिकेत गेले होते तेव्हा कुंभेतील गंगेचे पाणी घेऊन गेले होते, त्यांना देण्यासाठी. गंगाजल हातात घेऊन त्या खोटे बोलणार नाहीत.
उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला आम्ही सज्ज आहोत
आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत, पंतप्रधान मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, तुम्ही कधी हिंदू झालात. एक वाक्य आहे, जो जितका पापी, कपटी आणि पाखंडी असतो, तो स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचा ढोंग करतो. आम्ही ते करत नाहीत, आम्ही आहोत. आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिले आहे. आजच्या शिबिराचा हाच संदेश आहे की आम्ही लढायला तयार आहोत. तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा, आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला आम्ही सज्ज आहोत. आम्ही आमच्या नेत्याच्या मागे ठामपणे उभे आहोत. महाराष्ट्रात, देशात उभे राहु आणि तुमचे ढोंग उघडे पाडू.
एवढा अंधश्रध्दाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता
महाराष्ट्रात जे चालू आहे सध्या, ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी, तो चश्मा, आज हे महाशय परत गावाला गेले आहेत. मला आता भीत वाटते, आज पौर्णिमा, अमावस्या काय आहे? कोणाचा बकरा कापणार आहेत? आता आम्हाला, महाराष्ट्राला अमावस्या पौर्णिमा आली की भीती वाटते. एवढा अंधश्रध्दाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता. हा महाराष्ट्र पुरोगामी आहे, फुले शाहू आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे.