कोणताही नवीन मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले शंभर दिवस किंवा तीन महिने हनिमून पिरेड असल्याचे म्हटले जाते. या काळामध्ये मुख्यमंत्री जे काही करतात त्यांच्या कामाचे कौतुक महाराष्ट्रातून होत असते. मात्र या हनिमून पिरेडमध्ये राज्यातील भाजप आणि ‘महाझुटी’ सरकारने काय केले? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यामुळे महाराष्ट्र चाललाय कुठे? याचा विचार करायचा असेल तर गेल्या शंभर दिवसात काय घडले, हे पहावे लागेल, असे देखील ते म्हणाले. गेल्या शंभर दिवसात या सरकारने एकही चांगली योजना आणली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ठाकरे गटाच्या वतीने नाशिकमध्ये आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत..
Source link