उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आज उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिकमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पण या शिबिराच्या आधीच नाशिकमध्ये वातावरण तापले आहे. दर्ग्याचे बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या पोलिस आणि मनपाच्या पथकावर जमावाने दगडफेक केली आहे. हे सर्व ठाकर
.
दरम्यान सकाळी आदित्य ठाकरेंच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. त्यानंतर खा.अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, खा.राजाभाऊ वाजे, राजन विचारे यांचे चर्चासत्र सूरु झाले आहेत. तर संध्याकाळी 6.30 वाजता उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील गोविंदनगर भागातील मनोहर गार्डन लॉन्स हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
ठाकरे गटाला गळती लागल्याने ठाकरे सक्रीय
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचे शिंदे शिवसेना व भाजपमध्ये इनकमिंग सुरू असताना पक्षसंघटनेला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राचे विभागीय शिबिर होत आहे. या शिबिरामध्ये हुबेहूब स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजामध्ये शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारित करण्यासाठी भाषण होणार आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिबिरावरून लक्ष हटवण्यासाठीच दर्ग्यावर कारवाई- राऊत
संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी भाजप आणि सत्ताधारी पक्षाने आजचाच दिवस निवडला. आज नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व महत्त्वाचे नेते आहेत. शिवसेनेचे अधिवेशन होऊ नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यात दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी मुद्दाम आजचाच दिवस निवडल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
कार्यकर्त्यांना नवी दिशा देण्यासाठी शिबिर
विधानसभा निवडणुकीच्या धक्क्यातून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते अजूनही बाहेर पडलेले नाहीत. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात विविध विषयांवर आंदोलन करण्याची संधी असतानाही ठाकरे गटात शांतता आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शिबिरातून नवी दिशा देण्याचे नियोजन पक्षाने हे शिबिर आयोजित केले आहे.
असे आहेत दुपारी कार्यक्रम
2:00 ते 3:00 वा. – संघटनेचा आत्मा व पुनर्बांधणी (वक्ते – अंबादास दानवे) 3:00 ते 4:00 वा. – खोटे खटले, फेक नरेटिव्ह व महाराष्ट्रापुढील समस्या (वक्ते – असीम सरोदे) 4:00 ते 4:30 वा. – शाहीरी कार्यक्रम (स्वप्निल डुंबरे) 4:30 ते 5:00 वा. – चित्रफीत – एक धगधगता विचार 5:00 ते 5:30 वा. – मार्गदर्शन – खा. संजय राऊत 5:30 ते 6:30 वा. – मार्गदर्शन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे