एकनाथ शिंदे – राज ठाकरेंची युती?, मुंबई महापालिकेपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?


Eknath Shinde Meet MNS Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकननाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर गेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवतीर्थावर युतीची चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनसाठी गेले होते. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीची ही पहिली वेळ नसली तर आजच्या भेटीला विशेष महत्त्व असेल. कारण विधानसभेत अमित ठाकरेविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर रिंगणात उभे होते. सरणवकरांची उमेदवारी मागे घेण्यावरून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा रंगली.

अमित ठाकरेंचा विधानसभेत पराभव झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना पहिल्यांदाच भेटत आहेत. मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे. तसंच अटीशर्थींसह फडणवीसांना अप्रत्यक्ष पाठिंबा देखील जाहीर केला आहे. अशातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कोणती राजकीय समीकरण उदयास येतात याची महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता असेल.

शिंदे-ठाकरेंमधील संबंधातील चढउतार

माहीमच्या विधानसभा उमेदवारीवरुन तणाव
अमित ठाकरेंचा पराभव राज यांच्या जिव्हारी
राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर केलेली टीका
गंगेच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेचं आंदोलन
राज ठाकरेंची शिंदेंवर सातत्यानं टीका

एकनाथ शिंदे भेटीचं राज काय? 
 

महापालिका निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून भेट
उद्धव विरोधात तगडं आव्हान उभं करण्याचा डाव
महायुतीत सामील होण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता
राज सोबत आल्यास उद्धव यांच्याबाबत सहानुभूती कमी
राज महायुतीत सामील होण्याच्या चर्चांना उधाण
ठाकरे-एकनाथ शिंदे पुन्हा जवळीक वाढली
विधानसभेतल्या सरवणकर वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती
त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी पुन्हा घेतली भेट
राज ठाकरेंचं गंगेबाबत वक्तव्य, सरवणकरांचं आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून महायुतीत धुसफूस चालू असल्याचा दावा केला जातो. आमच्या फाईल्स अर्थखात्याकडून अडवल्या जातात, अशी तक्रार अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांकडे केली असल्याचं बोललं जातंय. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली गेली नाही. अशा अनेक घडामोडी घडत असताना आता एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7game0