स्वच्छतेचा संदेश, महाप्रसाद,संगीतमय भजनसंध्या, कीर्तन, पालखी सोहळा यासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शनिवार आणि हनुमान जयंती असा दुर्मिळ योग तब्बल ६० वर्षांनंतर आल्यामुळे आजच्या हनु
.

शहरामध्ये विविध मंडळांनी हनुमान जयंतीनिमित्त आकर्षक अशा मुर्ती उभारुन जन्मोत्सव साजरा केला. तसेच शहरातील विविध तालिमीमध्ये आकर्षक रोषणाई करुन युवकांनी कावडीने आणलेल्या पाण्याने अभिषेक करण्यात आले.
नेप्तीत मंदिर परिसर स्वच्छ करत स्वच्छतेचा संदेश नगर तालुक्यातील नेप्ती येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर सेवेकरी मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान जयंतीनिमित्त दक्षिण मुखी हनुमान मंदिर सेवेकरी मंडळांनी हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर करून स्वच्छतेचा संदेश दिला .मंदिरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढल्या तसेच मंदिरामध्ये फुलाची आकर्षक सजावट करून मंदिरावर विद्युत रोषणाई केली.