पुण्यातील कुख्यात गुंडाला भर मैदानात कानफाडीत मारणाऱ्या तरुणाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा; तो आहे कोण? तो करतो काय?


Pune Crime News : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर (Nilesh Bhau Gaiwal )धाराशिवमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली. भूम तालुक्यातील अंद्रुड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त भरलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला. एका तरुणाने भर मैदानात  निलेश घायवळच्या कानशिलात लगावली.  निलेश घायवळवर हल्ला करणाऱ्या तरुणाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. तो आहे कोण? तो करतो काय? या शोध घेतला जात आहे. 

भूम तालुक्यातील  अंद्रुड येथे यात्रेदरम्यान कुस्तीवेळी मराहाणाची हा प्रकार घडला. यात्रेतील कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन मुख्यात गुंड निलेश घायवळनं केले होते. घायवळ आखाड्यात पैलवानांशी भेट घेत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पैलवान असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर घावळ्याच्या कार्यकर्त्यांनी त्या पैलवानाला जबर मारहाण केली. मात्र हल्ल्यानंतर हा तरुण घटनास्थळावरून पसार झालाय. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही.

याप्रकरणी हल्ला करणा-या तरुणाची ओळख पटली आहे. सागर मोहोळकर असं हल्ला करणा-या तरुणाचं नाव आहे. हल्लेखोर हा अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. निलेश घायवळ हा जत्रेतील कुस्तीच्या फडात पहिलावानांचं अभिनंदन करायला आला होता. तेव्हा गर्दीतून वाट काढत सागर मोहोळकराने निलेश घायवळवर हल्ला केला. आजवर गुंडाने तमुक एका माणसाला मारहाण केली असं ऐकलं असेल. पण एका साध्या माणसाने कुख्यात गुंडाच्या श्रीमुखात लगावल्याने याची चांगलीच चर्चा आहे.  निलेश घायवळ हा पुण्यातील मोठा गुंड आहे. त्याच्याविरोधात 12 गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

microgaming slots