पुण्यात 27 वर्षीय परदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार, राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यासह 7 जणांना अटक


Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 2020 पासून पुण्यात वास्तव्यास असलेल्या भूतानच्या महिलेवर 7 जणांनी लैंगिक अत्याचार केला. राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनु कुकडे याच्यासह त्याच्या मित्रांना अटक केली आहे. कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी 2 तरुणींचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून शंतनु कुकडे यासह ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, ॲड विपीन बिडकर, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासीन मेनन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची भूतान या देशाची असून 2020 मध्ये ती भारतात असलेल्या बोधगया येथे आली होती. त्यानंतर शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश याच्यासोबत झाली. ऋषिकेश याने त्या पीडित महिलेची ओळख त्याचा मित्र शांतनू कुकडे याच्यासोबत करून दिली. कुकडे याने पीडित महिलेला पुण्यात एक घर वास्तव्यास दिले तसेच तिच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली. याच ओळखीचा फायदा घेत शंतनु कुकडे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले

पुण्यात वास्तव्यास असताना कुकडे याने पीडित महिलेची त्याच्या आणखी काही मित्रांसोबत ओळख करून दिली. पार्टीच्या निमित्ताने कुकडे आणि त्याचे काही मित्र बऱ्याचदा पीडित महिलेच्या घरी जात असे. यातील एक आरोपी हा डीजे असून दुसरा आरोपी पेशाने वकील आहे. आरोपींनी ओळखीचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेत पीडितेवर लोणावळा, रायगड आणि पानशेत याठिकाणी पार्टीच्या नावाखाली पीडित महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक ही केली आहे 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24