भूतान देशाची नागरिक असलेली 27 वर्षीय तरुणीवर पुण्यात लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या आरोपांनुसार 9 जणांवर समर्थ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी या मित्रांन
.
या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भूतान देशाची नागरिक असलेली सत्तावीस वर्षीय तरुणी 2020 मध्ये पुण्यात वास्तव्याला आली होती. ती भारतात बोध गया येथे आली असताना शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश नवले सोबत झाली. तर ऋषिकेश यानेच या तरुणीची ओळख मित्र शंतनू कुकडे यांच्यासोबत करून दिली. कुकडे हा एक संस्था चालवतो. कुकडे यानेच त्या मुलीला पुण्यात घर वास्तव्यास दिले. तसेच शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत शंतनू कुकडे याने त्या मुली सोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले.
कालांतराने शंतनू कुकडे याच्या सोबत त्याचे मित्र देखील पीडित मुली सोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी येऊ लागले. अनेकदा हे सर्वजण बाहेर देखील फिरायला जात होते. त्यावेळी या मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी तरुणी सोबत लैंगिक अत्याचार केले. यामध्ये शंतनू कुकडे यांच्यासह इतर नऊ आरोपींचा समावेश आहे. यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध वकील विपिन बिडकर यांचा देखील समावेश आहे. त्यांच्यासह शंतनू कुकडे, ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी, मुद्दासीन मेमन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी
या प्रकरणातील आरोपी शंतनु कुकडे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याच्या विरोधात समर्थ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील नामांकित वकील विपिन बीडकर यांना देखील पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल म्हणाले, शंतनु कुकडे प्रकरणाचा पोलिस तपास करत असताना, कुकडे याच्या फाउंडेशन मार्फत भूतानची एक तरुणी मागील अनेक वर्षापासून त्याच्या सोबत राहत होती. सदर तरुणीची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती कुकडे याच्या फाउंडेशनच्या माध्यमातून राहत असताना, कुकडे याच्या ओळखीतील अनेक जणांची ये-जा वेगवेगळ्या कारणाने, पार्टीकरिता सुरु असायची. यादरम्यान, एक वर्षापूर्वी विपिन बीडकर देखील सदर ठिकाणी येऊन त्यांनी तरुणी सोबत अतिप्रसंग केल्याची तक्रार तरुणीची आहे.