पुणे ग्रामीण जिल्ह्यातील जागरूक नागरीकांकडून पोलिस खात्यास नेहमीच सहकार्य लाभते. त्यामध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्था प्रश्न असेल किंवा सामाजिक, राजकीय, धार्मिक मुद्यांतर्गत तणाव असेल अशावेळी नागरीकांकडून पोलीस खात्यास योग्य सहकार्य केले जाते.समाजाती
.
देशमुख म्हणाले,सध्याचे कालावधीत मोबाईल हा मनुष्याचे जीवनातील एक अविभाज्य घटक झालेला असून याच मोबाईल मधील सोशल मिडीयाचा वापर करून नागरीकांना आपली तक्रार करणे सुलभ होणार आहे. बऱ्याच जागरूक नागरीकांना आजुबाजूला अगर परिसरात असणारे अवैध धंद्यांविषयी तक्रार करावयाची असते, परंतु प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला जावून तक्रार देण्यासाठी त्यांना शक्य होत नाही अगर भिती वाटत असते. त्यामुळे नागरीकांनी पोलीस स्टेशनला न जाता, आहे त्या ठिकाणाहून मोबाईल मधील” व्हॉट्स अॅप” या सोशल मिडीया अॅपचा वापर करून अवैध धंदे व्यवसाय विषयीची तक्रार,माहिती देणे सुलभ होणार आहे. ” व्हॉट्सअॅप दक्ष प्रणाली” उपक्रमांतर्गत 9922892100 हा व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर पुरविण्यात येत आहे.
नागरीकांनी 9922892100 हा मोबाईल नंबर आपले मोबाईल मध्ये सेव्ह करून या मोबाईल नंबरचे व्हॉट्स अॅप वर सुरूवातीस Hi असा शब्द/मेसेज पाठवून चॅटींग सुरू करावे. सदर मोबाईल नंबरवरील व्हॉट्स अॅप हे स्वयंचलित असल्याने त्यावरून आपणास प्रतिसाद मिळेल व पुढील पर्याय सुचविण्यात येतील. सदरची प्रणाली ही मराठी मध्ये असून अगदी सोप्या पद्धतीने तिचा वापर करता येणार आहे. या प्रणालीद्वारे नागरीकांना आपले परिसरातील अवैध धंदे अवैध व्यवसायाविषयीच्या तक्रारी पोलीसांना देताना त्यामध्ये अवैध व्यवसाय असलेल्या ठिकाणाचे नाव, अवैध व्यवसाय करणाराचे नाव, फोटो, लोकेशन अशी माहिती देता येणार आहे. सदरचे ठिकाणाबाबत संबंधित पोलीस स्टेशन व पोलीस उपविभागाचे नाव नोंदविणे आवश्यक राहणार आहे. ही सर्व प्रक्रीया प्रणालीद्वारे स्वयंचलित असून तक्रारदार यांचा मोबाईल नंबर तसेच त्यांचे नाव हे पुर्णतः गोपनीय राहणार आहे.