Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने मित्रासोबत शरीरसंबंध ठेवावेत अशी बळजबरी पतीनेच केली. याबाबत पत्नीला जेव्हा संशय आला तेव्हा तिने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी संबधीत पती व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलबाळ व्हावे आणि पुरुषार्थ सिद्ध व्हावा यासाठी पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी पतीने मित्रालाच घरी आणल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पीडित महिला ही पुण्यातील असून पती हा सांगलीचा आहे. 2 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते.
जुलै २०२३ मध्ये दोघे एकत्र राहत असताना पती त्याच्या मित्राला घरी घेऊन आला होता. तसंच तो इथेच राहणार असे त्याने पत्नीला सांगितले. पण मित्र आपल्याकडे वाईट नजरेने पाहत असल्याचे आणि त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे पत्नीने अनेकदा पतीला सांगितले. मात्र त्याने तिच्या सांगण्यावर दुर्लक्ष केले. यावरुन दोघांत सातत्याने वाद होऊ लागले. मात्र तरीही पतीने ऐकलं नाही.
दोघांमध्ये सातत्याने वाद निर्माण होऊ लागले. वाद टोकाला गेल्यामुळे पीडित महिला पतीला सोडून माहेरी निघून गेली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पतीच्या मित्राने पीडित महिलेला फोन करून “तुझ्या पतीने मला तुझ्याकडे शरीरसंबंधासाठी येण्यासाठी सांगितले होते. तसेच, तुझ्या पतीचा लैंगिक प्रॉब्लेम आहे,” असं सांगितलं. त्याने मला तुझ्याकडे तो नपुंसक असल्यानेच व मूलबाळ व्हावे, या दृष्टीने शरीरसंबंध ठेवण्यासाठी आणल्याची धक्कादायक माहिती तिला दिली. या नंतर पीडित महिलेने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर महिलेने पती आणि त्याच्या मित्राविरोधात तक्रार दिली आहे. यावरून त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्यातील एका तरुणीचा बेंगळुरुात खून झाल्याची घटनादेखील उघडकीस झाली आहे. पत्नीची हत्या करत पतीने मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला आहे. गौरी खेडकर असं मृत पत्नीचे नाव असून राजेश आणि गौरी हे दोघेही मूळचे महाराष्ट्राचे आहेत. काही दिवसांपूर्वीच हे दांपत्य बेंगलोर मध्ये राहायला गेल होतं. राजेश मुंबई जोगेश्वरीचे आहेत तो 2 वर्षापूर्वी बेंगलोरला शिफ्ट झाले होते. पण गौरी पुण्याची होती. ती लग्नानंतर पतीसोबच तिकडे राहायला गेली होती. नराधम पतीने पत्नीची हत्या करत तिच्या बॉडीचे तुकडे करत सुटकेस मध्ये ठेवले भरून होते. आरोपी राजेंद्र खेडकर ला बेंगलोर आणि सातारा पोलिसांनी त्याला शिरवळ मधून ताब्यात घेतले आहेत.