छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याची रोल्स रॉईस कार अखेर पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथील तुषार कलाटे नामक एका प्रसिद्ध बिल्डरच्या फार्म हाऊसवर आढळली आहे. यामुळे कोरटकरची ही आलिशान कार
.
प्रशांत कोरटकरवर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा व छत्रपतींचा अवमान केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला गत 24 मार्च रोजी तेलंगणातून अटक केली. सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. कोरटकरचे रोल्स रॉईस या महागड्या कारसोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते. ही कार आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असणाऱ्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावाने होती. ती कोरटकरकडे कशी आली? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित झाला होता. सीआयडीलाही ही कार सापडत नव्हती. पण आता WB-02-AB 123 क्रमांकाची ही कार पिंपरी चिंचवड येथील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या मुळशी येथील फार्म हाऊसवर उभी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोरटकर – कलाटेंचे एकत्र व्हिडिओ
‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार, प्रशांत कोरटकर व तुषार कलाटे यांचे काही एकत्रित व्हिडिओही समोर आलेत. या व्हिडिओत हे दोघे मनोहर भोसले या वादग्रस्त मांत्रिकासोबत दिसून येत आहेत. मनोहर भोसलेवर यापूर्वी अघोरी विद्येच्या माध्यमातून अनेकांना लुबाडल्याचे व लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. यामुळे तुषार कलाटेंनी ही रोल्स रॉईस कार कोरटकरच्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांतून मिळवली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरटकरने मोतेवारच्या गाडीचा लिलाव घडवून आणला?
महेश मोतेवारवर लक्षावधी गुंतवणूकदारांची 4700 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. मोतेवारच्या मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करणे या प्रकरणात अपेक्षित होते. पण आता लिलावाची जबाबदारी असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनीच त्याची मालमत्ता लुबाडल्याचा आरोप केला जात आहे. अधिकाऱ्यांनी त्याची 7-8 कोटींची रोल्स रॉईस कार जप्त केली. पण तिचा लिलाव केला नाही. ही कार विकता येणार नसल्याची नोटीस सीबीआय व सीआयडीीने 2015 मध्ये काढली होती.
पण प्रशांत कोरटकरने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत असणाऱ्या आपल्या संबंधांतून ही नोटीस कथितपणे मागे घ्यायला लावली. गाडीवर कर्ज असल्याचे दाखवत बँकेमार्फत तिचा लिलाव घडवून आणला. त्यानंतर कलाटेंनी ही गाडी 2 कोटींना खरेदी केली. त्यानंतर कोरटकरने ही गाडी पुण्यातील रेंजहिल्स भागात चावलून आपले फोटो काढले व व्हिडिओही शूट केले. कोल्हापूर पोलिस व सीआयडी या कारचा शोध घेत होते. पण ती सापडत नव्हती. अखेर ही गाडी तुषार कलाटे यांच्या फार्म हाऊसवर उभी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा…
सुदर्शन घुलेचा जबाब अर्धवट?:सर्वकाही लपवण्याचा प्रयत्न; तिन्ही आरोपींचा एका स्टँडर्ड फॉर्मेटसारखा, अंजली दमानियांचा आरोप
बीड – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याने पोलिसांना दिलेला जबाब अर्धवट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी प्रस्तुत प्रकरणातील तिन्ही आरोपींचा जबाब एका स्टँडर्ड फॉर्मेट सारखा असल्याचा दावा करत काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर