संभाजी ब्रिगेडने रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाच्या मुद्यावरून राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने 1 मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्वतः पुढाकार घेऊन हे शिल्प हटवण्याची कारवाई करेल, असा
.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेद्वारे रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर संभाजी भिडे यांनी त्यांच्या या मागणीला विरोध दर्शवला होता. संभाजीराजे भोसले जे म्हणाले ते 100 टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याविषयी मी वाचले आहे. ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हेच सत्य आहे. त्यामुळे त्याचे स्मारक रायगडावर केले गेले, असे भिडे म्हणाले. त्यांच्या या भूमिकेनंतर संभाजी ब्रिगेड यांनी 1 मेपर्यंत वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याची मागणी केली आहे.
1 मेपर्यंत पुतळा हटवण्याचा अल्टिमेटम
संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर या प्रकरणी म्हणाले की, राज्य सरकारने 1 मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून घ्यावा. सरकारने आमचा हा अल्टिमेटम पाळला नाही, तर संभाजी ब्रिगेड हा पुतळा हटवण्यास पुढाकार घेईल. आम्ही या प्रक्रणी संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. सरकार त्यांच्या भूमिकेला कोणता प्रतिसाद देते त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मराठा जोडो यात्रा संपल्यानतंर 1 मे रोजी आम्ही स्वतः पुतळा काढण्यास जाणार.
सौरभ खेडेकर यांनी यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे यांनाही आव्हान दिले. संभाजी भिडे वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचा दावा करत आहेत. पण त्यांचा दावा आम्हाला मान्य नाही. त्यांनी आमच्यासोबत चर्चेला यावे, असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे संभाजी ब्रिगेडने 2011 साली हा पुतळा हटवला होता. पण त्यानंतर धनगर समाजाने तो पुन्हा बसवला होता.
आता पाहू काय आहे वाद?
वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव कुत्रा होता. त्याने शिवरायांच्या अंत्यसंस्कारावेळी जळत्या चितेत उडी घेऊन स्वतःची जिवनयात्रा संपवली, अशी दंतकथा या प्रकरणी सांगितले जाते. पण वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाविषयी इतिहासाकारांमध्ये एकवाक्यता नाही. काहींच्या मते, वाघ्या हे केवळ एका दंतकथेतील पात्र आहे. तर काहीजण वरील दंतकथा खरी असल्याचा दावा करतात. त्यांच्या मते, रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी 1906 मध्ये इंदूरचे राजे तुकोजी होळकर यांनी देणगी दिली होती. त्यातून ही समाधी बांधली गेली होती. पण आता इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे अस्तित्वात नसल्याचे नमूद करत या वादाला सुरुवात केली. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनीही हा मुद्दा उचलून धरला. त्यात आता संभाजी ब्रिगेड व संभाजी भिडे यांनी उडी घेतल्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा…
छत्रपती शिवराय सर्वधर्मीय नव्हते:संभाजी भिडे यांचा दावा, म्हणाले – महाराजांसह शंभूराजांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला
सांगली – छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांसह शंभूराजेंनी हिंदवी स्वराज्याचा मांडला आहे, आपल्याकडील शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत हे सर्व चुकीचा इतिहास मांडत आहेत, असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे.
संभाजी भिडे पुढे बोलताना म्हणाले की पक्ष, संघटना शिवरायांच्या नावाचा स्वार्थासाठी वापर करत आहेत. खरे तर छत्रपती शहाजीराजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे या मताचे होते. त्यात त्यांना यश आले नाही, पण त्यांचा विचार पुढे आणला तो शिवरायांनी. वाचा सविस्तर