मी जबाबदारीने सांगतो काल अध्यक्षांच्या कर्मचाऱ्याच्या ऑफिसात सत्ताधारी पक्षाचे आमदार गेले असून लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा, असे आमदारांनी म्हटल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे.
.
दरम्यान भास्कर जाधव यांनी पुढे बोलताना म्हटलंय की, विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारने तसे जाहीर करावे. आम्ही आमचे काम केले आहे. विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. सरकारकडे बहुमत असून ते घाबरत आहे? असा सवाल ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, भास्कर जाधव यांना बोलण्याचा अधिकार आहे. पण जनतेने ऐवढे जे बहुमत दिले आहे. आपण अध्यक्ष असताना हे जे काही बोलले जात आहे ते रेकॉर्डवरुन काढले पाहिजे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी आणि सांगावे. आम्ही सरकार चालवत आहोत अशा गोष्टींना पाठिशी घाल्यासाठी आम्ही इथे बसलो नाही.परंतू आम्ही सभागृहात बसलेलो असताना त्यात कासही तथ्थ आहे की नाही, पुरावे आहे की नाही याबद्दल माहिती न घेताच वक्तव्य केले आहे. भास्कर जाधव तुमचा अनुभव पाहता तुम्ही असे बोलणे योग्य नाही. सभागृहाची बदनामी आम्ही होऊ सहन करणार नाही. हे थांबले पाहिजे.
विधानभवनाचे 10 हजारांमध्ये मिळतात पास
भास्कर जाधव म्हणाले की, अध्यक्ष यांच्याजागी जो तालिका सभापती बसेलला असतो तो अधिवेशन काळापुरता तालिका सभापती असतो. त्यालाही त्या खूर्चीवर बसल्यावर विधानसभा अध्यक्षांचे अधिकार असतात. एका वृत्तपत्राने 10 हजार रुपये घेऊन विधानभवनात येण्यासाठी मिळतात, असे म्हटले आहे.