अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच ऑस्टिओ नेक्रोसिस. यामध्ये हिप्सच्या जॉईंटना रक्तपुरवठा पोहोचत नसल्यानं हाडांच्या ऊती मृत पावतात. तरुणांमध्ये मद्यपानाचे वाढते प्रमाण हे एक चिंतेचे कारण ठरत आहे. ज्याचे दीर्घकालीन परिणाम चिंताजनक आहेत. अति मद्यपानाच्या
.
डॉ. आशिष अरबट म्हणाले, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये चरबीयुक्त पदार्थ जमा होऊ शकतात. हे हाडांमधील रक्त प्रवाह अवरोधित करतात, परिणामी अव्हॅस्कुलर नेक्रोसिस होतो.मागील महिनाभरात उपचाराकरिता आलेल्या रुग्णांपैकी अति मद्यपान करणाऱ्या ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे १० पैकी ५ व्यक्तींमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिसची समस्या आढळून येते. अशा रुग्णांना हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. प्रौढांमध्ये एव्हीएनच्या प्रकरणांमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अतिमद्यपान हे नितंबाच्या अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे एक प्रमुख कारण ठरते आहे. अव्हॅस्कुलर नेक्रोसिस ही अशी स्थिती आहे जिथे रक्तपुरवठ्याअभावी हाडांच्या ऊती मरतात, ज्यामुळे सांधेदुखी आणि हाडे ठिसूळ होतात, तूटतात . मद्यपान आणि स्टिरॉइडचा वापर हा ६५% पेक्षा व्यक्तींमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिससारख्या समस्येस कारणीभूत ठरतो. अल्कोहोलच्या सेवनाने अव्हॅस्कुलर नेक्रोसिस झालेले बहुतेक रुग्ण सहसा ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील असतात. अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचा धोका इतर घटकांवर देखील अवलंबून असतो,जसे की तंबाखूचा वापर, जुनाट आजार आणि अनुवांशिकता. मद्यपानामुळे ऑस्टिओनेक्रोसिसचा धोका वाढते. याची लक्षणे म्हणजे कंबरदुखी, स्नायुंमधील कडकपणा आणि स्नायुंच्या हलचालींवर येणाऱ्या मर्यादा. या रुग्णाप्रमाणेच, नितंबाचे हाड मोडलेल्या रुग्णांवर टोटल हिप रिप्लेसमेंटने उपचार केले जातात.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राजन कोठारी म्हणाले की, तरुणांमध्ये हिपच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत कारण अनेकांना अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे निदान होत आहे. त्यामागची कारणे म्हणजे स्टिरॉइड्सचा गैरवापर, हाड मोडणे, नितंबाचे हाड मोडणे, रेडिएशन थेरपी, अति मद्यपान अशी आहेत. अल्कोहोलचे सेवन आणि अव्हॅस्कुलर नेक्रोसिस यांच्यात परस्परसंबंध आहे. जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन हा अव्हॅस्कुलर नेक्रोसिससाठी एक जोखीम घटक आहे, कारण तो हाडांमधील रक्त प्रवाह बिघडवतो, ज्यामुळे हाडांमधील पेशींचा मृत्यू होतो. त्याच्या लक्षणांमध्ये सांधेदुखी आणि स्नायुंचा कडकपणा यांचा समावेश आहे.