सरकारी शाळांबाबत मोठी बातमी, ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत मोठा बदल


Maharashtra School Uniform: राज्यात ‘एक राज्य एक गणवेश’ योजना सुरू करण्यात आली असली तरी सुसूत्रतेअभावी ही योजना फसली असल्याच समजत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता यासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले असून यापुढे मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे. 

थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. 

दोन मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय

राज्यात ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेची अंमलबजावणी 2024-2025 पासून सुरू झाली. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक नियमित स्वरूपाचा गणवेश तर स्काऊट व गाईड या विषयासाठी दुसरा गणवेश होता.

 मात्र, गणवेश तयार करण्याची जबाबदारी महिला बचत गटांकडे देण्यात आली आहे. अर्धे सत्र संपल्यावरही अनेकांना गणवेश मिळाले नाहीत. काहींना मापापेक्षा मोठे गणवेश मिळाले. त्यामुळे सरकारने या योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता  विद्यार्थ्यांना वेळेवर आणि नियमित गणवेशाचा पुरवठा व्हावा म्हणून थेट शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात पैसे पाठवण्यात येणार आहेत.

योजनेत कोणते बदल?

• गणवेश पुरवठ्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे असणार आहे.

• वेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीला निधीचे वाटप करण्यात येणार आहे.

• विद्यार्थ्यांना वेळेवर व नियमित गणवेश पुरवठा होणार.

• स्थानिक पातळीवर खरेदी व शिलाईमुळे रोजगार मिळणार.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24