‘ॲग्रोटेक २०२४’ मध्ये प्रथमच पुष्प प्रदर्शन!: कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर २७ ते २९ डिसेंबरदरम्यान आयोजन – Akola News



कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब ऊर्फ पंजाब राव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर २७ ते २९ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय राज्यस्तरीय “ॲग्रोटेक २०२४’ कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजनात

.

सर्व फुल प्रेमी नागरिक आपल्याकडील प्रदर्शन योग्य शोभिवंत फुलझाडे, बोन्साय, वेली इत्यादी प्रदर्शनात ठेवण्याकरता निमंत्रित असल्याचे तथा सहभागी पुष्प प्रेमींना प्रमाणपत्र देखील देण्यात येणार असल्याचे व सहभाग प्रवेशिका विभागात उपलब्ध असल्याचे देखील आयोजकांनी कळवले आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गुडखा यांच्या मार्गदर्शनात विदर्भातील सर्व जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, आत्मा संचालक, विद्यापीठ अंतर्गत सर्व कृषी महाविद्यालये, कृषी तंत्र विद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र, कृषी तंत्र विद्यालये, संशोधन प्र क्षेत्र तथा विभागांद्वारे यंदा कृषी प्रदर्शन व चर्चासत्राचा प्रचार प्रसार करण्यात येत असून, पुष्प प्रदर्शन हे यंदाच्या प्रदर्शनाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य असणार आहे.

अधिकाधिक शेतकरी, युवक -युवती, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता बचत गट, शेती क्षेत्रात सेवारत कृषी पदवीधरांनी कृषि प्रदर्शनाचा लाभ घेत अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी विषयक प्रक्रिया उद्योग, यंत्र अवजारे पुष्प प्रदर्शन आदी बाबत इतरांना देखील याविषयी अवगत करावे असे आवाहन विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, उमेश घाटगे यांनी केले आहे.

पुष्प प्रदर्शनासाठी उद्यान विद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. देवानंद पंचभाई, पुष्प शास्त्र व प्रांगण विभागाचे प्रमुख प्रा. नितीन गुप्ता, डॉ. मनीषा देशमुख, डॉ. नवीन राठोड, पुरुषोत्तम उंबरकर, डॉ. सपना राजदरकर, अनुज राऊत, परमेश्वर सवडे व त्यांचे सर्वं सहकारी, विद्यार्थी अथक परिश्रम घेत आहेत.

वेगवेगळ्या गटात असेल फुलांची वर्गवारी या पुष्पप्रदर्शनाकरिता पुष्परचनागट, सिंगल कट फ्लॉवर गट, विविध फुलझाडांच्या कुंड्या, विविध इनडोअर प्लांट्स, शोभिवंत झाडे, वेली, फर्न, पाम, सिंगल पॉट कॅक्टस व सकुलंट्स, बोनसॉय, हँगिंग पॉट्स, कल्पक प्रकार, हारांचे प्रकार आदी वर्गवारी करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24