जयघोष करत आणि फुलांच्या पाकळ्या उधळत, सडा रांगोळीच्या प्रसन्न वातावरणात तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींच्या सातव्या पुण्याराधनानिमित्त पालखी मिरवणूक निघाली.
.
पालखीचे पूजन काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव शांतया स्वामी, संचालक डॉ. राजेंद्र घुली उपस्थित होते. प्रशालेतील मुलामुलींचे लेझीम पथक, मुलींचा समूह नृत्य, ढोल भगवे ध्वज व रथामध्ये महास्वामींची प्रतिमा, शंकर, पार्वती व महास्वामींची वेशभूषा केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. ही मिरवणूक राजीवनगर, किसाननगर, साईनगर, मल्लिकार्जुननगर या मार्गावरून काढण्यात आली. ही पालखी एसबीसीएस प्रशाला एमआयडीसी ते वीर तपस्वी मंदिर या मार्गावरून निघाली होती. यावेळी विद्यार्थ्यांना महाप्रसादाची सोय करण्यात आली. प्रशालेचे उपमुख्याध्यापक धनंजय नकाते, पर्यवेक्षक संतोषकुमार तारके व संकुलातील सर्व कर्मचारी पालक उपस्थित होते.