छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठात बाेलताना साेनम वांगचुक.
अापण सर्व अापल्या धर्मात सुधारणा करू. हिंदू २.० करावे लागेल. शिक्षण, धर्म, देव, कायदा याची परिभाषादेखील बदलावी लागेल, असे मत शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी व्यक्त केले. छत्रपती संभाजीनगरमधील महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम)
.
क्लायमेट रिफ्युजी बनून आपल्याला फिरावे लागेल. हा मोठा धोका येत्या काळात आहे. याचे कारण प्रदूषणामुळे दरवर्षी एक कोटी लोक मरण पावतात. विश्वयुद्धाप्रमाणे हे युद्ध सुरू झाले आहे. हे थांबवण्यासाठी आतापासून काही उपाय करावे लागतील. येणाऱ्या काळात उत्तर भारताला विस्थापित व्हावे लागेल. काही बदलावे लागेल. शिक्षण, धर्म, देव, कायदा याची परिभाषा बदलावी लागेल. प्रदूषणामुळे दिल्लीत दहा वर्षे आयुष्य कमी झाले आहे. पाप काय आहे? केवळ बंदुकीने मारणे पाप आहे का? प्रत्येकाच्या गरजेनुसार सगळे उपलब्ध आहे, पण प्रत्येकाच्या हव्यासाला पूर्ण करण्यासाठी नाही. दिल्ली, मुंबई विकासाने विश्वगुरू होणार नाही. पाप, पुण्याला परिभाषित करण्याची गरज आहे. जीवनशैली, पर्यावरणाच्या प्रश्नांनी लोकांचे मृत्यू होत आहेेत.
प्रत्येक धर्म अहिंसेबद्दल बोलतो. कारण हिंसेचा अतिरेक होताे. त्यातून सर्व शक्तिमान देवाची संकल्पना समोर आली. आजही हिंसाचार आहे, पण त्याची नोंद होत नाही. प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे. ‘गॉड २.०’ समोर आणला पाहिजे. आपण सर्व आपल्या धर्मात सुधारणा करू. ‘हिंदू २.०’ करावे लागेल. आजच्या समस्यांवर धर्मामध्ये काहीही नाही अशी युवकांची भावना असल्याने चर्चमध्ये जात नाहीत. असे अमेरिकेत घडत आहे. धार्मिक गुरूंनी यावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिक शिक्षणाला पुन्हा परिभाषेत करावे. आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवाव्यात. मोठ्या शहरात साध्या पद्धतीने लोकांनी राहावे, जेणेकरून डोंगरदऱ्यात राहणारी माणसेदेखील चांगली जगू शकतील. महात्मा गांधीजींच्या विचारानुसार मार्गक्रमण करावे.