भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयात शिरले. यावेळी कार्यकर्त्यांकडून कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी, वर्षा गायकवाड यांच्या फोटोंवर काळी शाही फेकण्य
.
ज्योती गायकवाड म्हणाल्या, मनुस्मृतीला मानणाऱ्या आरएसएस-भाजपचा संविधान विरोधी, आंबेडकर विरोधी आणि महिला विरोधी चेहरा आज पुन्हा एकदा उघड झाला आहे. महामानव, भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याबद्दल देशाची माफी मागण्याऐवजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावर भाजपच्या गुंडांनी आज एक कट्टर आंबेडकरवादी, एक महिला, एक दलित असलेल्या मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड ताई यांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला केला. हा हल्ला सुनियोजित आणि भाजपच्या श्रेष्ठींच्या सांगण्यावरून केला गेला असल्याचा आरोप ज्योती गायकवाड यांनी केला आहे.
पुढे बोलताना ज्योती गायकवाड म्हणाल्या, यांच्या गुंडशाहीला काँग्रेसचा कार्यकर्ता भीक घालत नाही. आंबेडकरी विचार आणि संविधानाची कास धरून आम्ही यांच्या मनुवादी प्रवृत्तीला पुन्हा पराभूत करू. लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा यांनी कितीही प्रयत्न केला तरी बाबासाहेबांचा अपमान देश सहन करणार नाही. अमित शहा यांना माफी मागावीच लागेल.
दरम्यान, कॉंग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ऐकताच का कोणास ठाऊक पण मनुवादी आरएसएस-भाजपाने नेहमी हेच केले… हल्ले आणि तोडफोड. अमित शाह ने देशाचे उद्धारक बाबासाहेब आणि आंबेडकरी चळवळीचे अपमान केले आहे. आता त्यांना वाचवण्यासाठी आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप गुंडगिरीवर आली असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, भाजपच्या 50 गुंडांनी आमच्या कॉंग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. खुर्च्या फेकल्या, पोस्टर्स फाडले, आणि मालमत्तेची तोडफोड केली. ही गुंडशाही नाही तर काय आहे. या भ्याड हल्लाच्या मी तीव्र निषेध करते. पण यांच्या गुंडगिरीला आम्ही भिक घालत नाही. आम्ही काँग्रेसचे बब्बरशेर कार्यकर्ते आहोत. आम्ही लढू, भिडू आणि जिंकू. आम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत.