हॉटेल बुकींग एजंटची महाबळेश्वरमध्ये आत्महत्या: लॉडविक पॉईंटवरून मारली उडी, करण अद्याप अस्पष्ट – Kolhapur News



महाराष्ट्राचं ‘मिनी काश्मीर’ म्हणजेच महाबळेश्वरच्या लॉडविक पॉईंटवरील कड्यावरून एकाने पाचशे फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडली. संजय वेलजी रूघानी (वय ५२, मूळ रा. शांतीनगर, मीरा रोड, मुंबई, सध्या

.

महाबळेश्वरात सध्या ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे. नाताळ सुट्टीच्या निमित्ताने महाबळेश्वर, पांचगणीतील हॉटेल्सचं बुकींग फुल्ल झालं आहे. अशातच हॉटेल बुकींग एजंट संजय रूघानी यांनी दरीत उडी मारून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यांचे दोन्ही मोबाईल घटनास्थळी सापडले आहेत. ते हॉटेल बुकिंग एजंट असल्यानं महाबळेश्वर आणि पाचगणीमधील अनेक हॉटेल्सवर त्यांचे येणं जाणं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

लॉडविक पॉईंटवर गुरुवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास एक परदेशी पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत होता, तर एक नवदाम्पत्य मोबाईलमधून व्हिडिओ चित्रिकरण करत होतं. आपल्या जवळपास कोणी नसल्याचं पाहून संजय रुघानी यांनी स्वतःला दरीत झोकून दिलं. त्या पर्यटक दांपत्याने लॉडविक पॉईंटवरील व्यावसायिकांना घटनेची माहिती दिली. व्यावसायिकांनी पोलीस आणि ट्रेकर्सना कळवलं.

घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य कुमार शिंदे, सोमनाथ वागदरे, अमित कोळी, सौरभ गोळे, जयवंत बिरामणे, अमित झाडे, सौरव सालेकर, सुजित कोळी, आतिश धनावडे, अनिल लांगी, सूर्यकांत शिंदे, सुजित कोळी, मंगेश सालेकर, दीपक ओंबळे, अक्षय नाविलकर, सचिन डोईफोडे, अनिकेत वागदरे, आशिष बिरामणे घटनास्थळी दाखल झाले. रोपांच्या साह्याने साडे पाचशे फूट खोल दरीत उतरून रात्री उशीरा त्यांनी मृतदेह दरीतून वर काढला.

गुजरातमधील पर्यटक अनिल अग्रवाल (वय ६६, रा. आत्माराम अग्रवाल सी/८०१, एकता अनुवऐ बी/एच एकता टॉवर वसना बर्रागे रोहद वसना अहमदाबाद, पालडी, गुजरात) यांनी २४ एप्रिल रोजी केट्स पॉईंटवरून रात्री सातच्या सुमारास सुमारे दरीत उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर आठ महिन्यात आत्महत्येची घडलेली ही दुसरी घटना आहे. अशा घटनांमुळे प्रसिद्ध पॉईंटवर पोलीस अथवा सुरक्षा रक्षक नेमण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24