औषधी गुणधर्म जपणारे सोनेरी सिताफळ (गोल्डन कस्टर्ड ॲपल) अमरावतीच्या बाजारात दाखल झाले आहे. हे फळ चवीला हिरव्या रंगाच्या गावरानी सिताफळासारखेच असले तरी त्यात सामान्य सिताफळाच्या तुलनेत अधिक पौष्टीकता असल्यामुळे त्याला अधिक पसंती मिळत आहे. सध्या कॉटन मा
.
‘शरीफा’ या नावाने बाजारात ओळखले जाणारे हे फळ उष्णकटिबंधीय देशांमध्ये आढळते. त्यामुळे भारतासह आफ्रीका आणि आशिया खंडातील इतर काही देशांमध्ये या फळाचा आढळ आहे. सध्या अमरावतीच्या बाजारात उपलब्ध असलेले सोनेरी सिताफळ हे नजिकच्या बुलडाणा, वाशिम जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील असून त्याला चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या फळांची विक्री किंमत ही त्याच्या आकारणानानुसार ठरते. फळ आकाराने जेवढे मोठे तेवढे ते महाग, अशी साधारण व्याख्या आहे. सामान्य सिताफळांच्या तुलनेत या सिताफळात बिया कमी असतात. याऊलट त्यात गर अधिक असतो. त्यामुळेही त्याला पसंती अधिक मिळते. सध्या या फळाचा किरकोळ बाजारातील प्रतिकिलो भाव साधारणत: ६० ते ८० रुपये असा आहे.
या फळाच्या सेवनामुळे तणावापासून स्वत:चा बचाव करता येऊ शकतो. गोल्डन सिताफळाचे सेवन करण्यापूर्वी ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. ते कधीही कच्चे खाऊ नये, परिपक्व झाल्यावरच त्याचा आस्वाद घ्यावा. जर आपणास एखादा आजार असेल किंवा एखाद्या आजारावरील औषधोपचार सुरु असेल तर गोल्डन सिताफळाचा स्वाद घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.